trees plantation esakal
जळगाव

Miyawaki Forest : मेहरुण तलाव परिसरात साकारणार मियावाकी वन; ‘सकाळ’, मराठी प्रतिष्ठान, ‘सुबोनियो’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Miyawaki Forest : पर्यावरणीय असमतोल आणि हवामानातील बदलामुळे शहराचे व जिल्ह्याचे तापमान दरवर्षी वाढतच असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धनाची गरज आहे.

त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’, मराठी प्रतिष्ठान व सुबोनियो केमिकल्स यांच्यातर्फे गुरुवारी (ता. २७) मेहरुण तलाव परिसरात वृक्षारोपण होणार आहे. (tree plantation will be done in Mehrun lake area by Miyawaki method jalgaon news)

पर्यावरणीय असंतुलनामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत असताना वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून ‘सकाळ माध्यम समूह’, विविध सामाजिक कार्यांत अग्रेसर मराठी प्रतिष्ठान व सुबोनियो केमिकल्स यांच्यातर्फे मेहरुण तलाव परिसरात हा मियावाकी वननिर्मिती प्रकल्प साकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

त्याचाच भाग म्हणून गुरुवारी सकाळी साडेनऊला मेहरुण तलावाकाठी सुबोनियो पक्षीघराजवळ वृक्षारोपण होईल. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या उपक्रमात ‘सकाळ-यिन’चे महाविद्यालयीन सदस्यही सहभागी होणार आहेत. परिसरातील नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षलागवड व संवर्धनाच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूह’, मराठी प्रतिष्ठानतर्फे जमील देशपांडे व ‘सुबोनियो’चे सुबोधकुमार चौधरी यांनी केले आहे.

अडीच हजार झाडे लावणार

या उपक्रमात ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येकी एका फुटावर वृक्षलागवड करण्यात येईल. प्रामुख्याने देशी वृक्षांची लागवड करण्यात येईल. वर्षभरात या परिसरात दाट जंगल दिसेल, असा हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. कदंब, काशीद, वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब, फापडा या प्रकारची रोपे लावण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT