atal bhujal yojana esakal
जळगाव

Atal Bhujal Yojana : अटल भूजल योजनेंतर्गत भूजल ग्राम समृद्ध योजना; प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अटल भूजपल योजनेंतर्गत गावांमध्ये लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाचे ब्रीद साध्य होण्यासाठी भूजल समृद्ध गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Under Atal Ground Water Scheme Ground Water Village Enrichment Scheme jalgaon news)

या स्पर्धेत जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहनपर निधी, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह, अशा स्वरूपाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

राज्यात भूजल उपशाचे प्रमाण अधिक असून, त्यातून प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भूजल उपसा जास्त होत असलेल्या क्षेत्रातील पाणलोट क्षेत्र अतिशोषित, शोषित व अंशत: शोषित, अशा वर्गवारीत समाविष्ट आहे.

शंभर गावांमध्ये योजना

पुर्नभरणापेक्षा भूजल उपसा अधिक झाल्यामुळे भूजलाच्या उपलब्धतेवर त्याचा विपरित परिणाम होतोय. या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होणारी घसरण, बाधित होत असलेली गुणवत्ता रोखण्यासाठी शासन व जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ही योजना जिल्ह्यातील १०० गावांमध्ये राबविली जात आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

गावांचा हवा सहभाग

या योजनेबाबत आशा किरण महिला विकास संस्थेमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. गावांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत ठराव करून ठरावाच्या प्रतीसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जळगाव यांच्याकडे २५ एप्रिलर्यंत सादर करावेत.

जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या गावास ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय बक्षीस २० लाख रुपये आहे. या स्पर्धेत गावांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन दहिकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Winter Arthritis Pain in Women: महिलांनो सावधान! हिवाळ्यातील सांधेदुखीमागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारण

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिका तारखा जाहीर होताच मनसे आणि ठाकरे गट लागले कामाला

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

SCROLL FOR NEXT