Rain Update News esakal
जळगाव

Rain Update : पहाटे सोसाट्याचा वारा अन्‌ पावसाची हुलकावणी; दिवसभर घामाच्या धारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. २९) रात्री दोन ते तीनच्या सुमारास सोसाट्याचा वाऱ्याने तब्बल एक तास धुमाकूळ घातला.

विजांचा कडकडाटही झाला. मात्र, वाऱ्यामुळे पावसाला हुलकावणी मिळाली. पहाटे एक तास वातावरणात गारवा निर्माण झाला होता. (unseasonal rain on 29 may in jalgaon news)

केरळात मॉन्सूनचे आगमन सुरू झाल्याने सोमवारी जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला होता. तो रात्री दोन ते तीनच्या सुमारास खरा ठरला. अचानक वादळी वारा सुरू झाल्याने गच्चीवर झोपलेल्यांना गच्चीवर झोपणे कठीण झाले होते. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने पलंगाला बांधलेल्या मच्छरदाण्याही उडून गेल्या.

वीजपुरवठा खंडित

अचानक सुरू झालेल्या वाऱ्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. गच्चीवर झोपावे, तर सोसायट्याचा वारा झोपू देत नव्हता, वीज गायब झाल्याने घरात कूलर व पंखे बंद होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे नागरिकांची झोप उडाली होती. पहाटे काही तास पावसाचे वातावरण असले, तरी दिवसभर दमट हवामानामुळे अंग चिकट होत होते. तापमान ४० अंश होते.

यंदा पावसाळा उशिरा सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात ७ ते ८ जूनला मॉन्सूनचे आगमन होते. यंदा मात्र ते उशिराने होईल. ७ व ८ जूनला पाऊस येईल. मात्र, त्याचे प्रमाण अल्प असेल. तो पाऊस मॉन्सूनपूर्व गणला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT