Corona Vaccination sakal media
जळगाव

जळगाव : लसीकरणामुळे ओमिक्रॉनची लक्षणे कमी

चार टक्के नागरिकांची नोंद नाही, ५० टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनाचा प्रतिबंध (corona update)करण्यासाठी गतवर्षी याच दिवशी (ता. १६ जानेवारी २०२१) कोरोना लसीकरणाचा (vaccination)शुभारंभ करण्यात आला. वर्षभरानंतरची स्थिती पाहता लसीकरणाचा पहिला डोस(vaccine first dose) ८० टक्के तर दुसरा डोस(vaccine second dose) ५० टक्के नागरिकांनी घेतला आहे. या लसीकरणामुळेच तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉनबाधितांना केवळ लक्षणे दिसत आहेत.सर्वांनाच रुग्णालयात दाखल होऊन ऑक्सिजनची गरज भासत नाही, असा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केला आहे.

अनेकांना केवळ गोळ्या- औषधी देत गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. १६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. अगोदर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्करांना लस देण्यात आली. नंतर पोलिस, महसूल अधिकारी, कर्मचारी यांना लस दिली. नंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना नंतर १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाले. लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदणीवरून अनेक ठिकाणी गोंधळही झाले. पोलिसांच्या उपस्थितीत लसीकरण करावे लागले. लसीकरणासाठी पहाटे चारपासून नागरिक विविध लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहत असल्याचे चित्र पोहावयास मिळत होते.

मात्र जशी दुसरी लाट(second wave of corona) ओसरली तसे लस घेण्याचे प्रमाणही घटले. अनेक ठिकाणी आता लसीकरण केंद्रे ओस पडलेली दिसून येतात. आता याच महिन्यापासून १५ ते १८ वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरू झाले आहे. युवकांचा चांगला प्रतिसाद लसीकरणास मिळत आहे. अनेक नागरिकांनी लस घेतली आहे. मात्र त्याची पोर्टलवर नोंदणी नसल्याने ती आकडेवारी आतापर्यंत झालेल्या लसीकरणात(vaccination) नाही. नोंद न झालेल्या नागरिकांची संख्या तीन ते चार टक्के आहे.

लसीकरणाबाबत अनेक शंका

लस घेतल्याने शरीरात जनुकीय बदल(Genetic changes) होतो. महिला गरोदर राहू शकत नाही. आदी विविध कारणांनी २० टक्के नागरिकांनी लस घेतलेली नाही. या सर्व शंकाकुशंका काढून टाकण्यासाठी संबंधित समुदायाच्या प्रमुखांचे सहकार्य घेण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे.

आकडे बोलतात...

आतापर्यंत झालेले लसीकरण

  1. आरोग्य, फ्रंटलाइन वर्कर्स - १ लाख २० हजार ९७१

  2. १८ ते ४५ वर्ष वयोगट - २० लाख २५ हजार ६६६

  3. ४५ ते ६० वयोगट - ९ लाख ४१ हजार ६३३

  4. ६० वर्षांवरील गट- ८ लाख ९६६

एकूण ३९ लाख ४७ हजार ३५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT