Chalisgaon: Waste water from the open water channels of the new scheme in the city. esakal
जळगाव

Water Wastage News : चाळीसगावात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय; पालिका करणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सुजल निर्मल पाणीपुरवठा योजनेंतर्गत गेल्या वर्षी शहरातील सर्व प्रभागात नवीन जलवाहिनी टाकण्यात आल्या. प्रत्येकाच्या घरापर्यंत नवीन नळ कनेक्शन देण्यात आले. मात्र, अनेक नागरिकांनी अद्यापही नळजोडणी न केल्याने हे पाणी रस्त्यावर वाहत आहे.

तर दुसरीकडे अनेक सार्वजनिक नळांना तोट्याच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून, याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. (Waste thousands of litres water in Chalisgaon Image from many not adding new faucet combinations Municipality will take action Jalgaon News)

खासदार उन्मेष पाटील हे २००९ ते २०१४ या कालावधीत चाळीसगाव तालुक्याचे आमदार असताना त्यांनी ‘सुजल निर्मल पाणीपुरवठा योजना’ (अंदाजे ७५ कोटी) मंजूर करून आणली होती. त्यानंतर पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना युतीचे नगराध्यक्ष सत्तेवर आले आणि ती योजना कार्यन्वित करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचे काम शहरात सुरू असून, पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शहरात रहिवाशांना तीन दिवसानंतर पाणीपुरवठा केला जाते. सुरवातीला विना इलेक्ट्रिक मोटारीचे पाणी व्यवस्थित येत असतानाही योजना अंमलात आणल्याचा आरोप काही जणांकडून करण्यात आला.

या मुद्यावरून पालिकेच्या बैठकीत जोरदार सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली होती. शेवटी नगरसेवकांनी एकमताने योजनेला मंजुरी दिली आणि शेवटच्या टप्प्यात हे काम सुरू झाले आहे.

या योजनेचे काम झाल्यानंतर शास्त्रनगरसह काही ठिकाणी जलवाहिनी लिकेज झाल्या आहेत. पालिकेला ते दुरुस्त करायला वेळ नाही.

पालिकेची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपल्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडेच राज्य सरकारने प्रशासकपदाचा कारभार दिलेला आहे.

श्री. ठोंबरे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये प्रशासकपदाचा कार्यभार घेतला होता. दरम्यान, प्रशासक ठोंबरे यांनी नागरिकांच्या पालिकेसंदर्भातल्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

प्रभागातील गटारी वेळेवर काढल्या जात नाहीत. पथदिवे सकाळी आठपर्यंत सुरू असतात. हजारो लिटर पाणी दररोज वाया जाते. त्याकडे कोणी लक्ष देत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खड्डे ‘जैसे थे’

प्रत्येक प्रभागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डे तयार करण्यात आले आणि ते खड्डे बुजविण्यासाठी त्याच्यावर टाईल्स लावण्यात येणार होत्या. परंतु त्या टाईल्स योग्य ठिकाणी न लावता नगरसेवकांनी त्याची सोईनुसार विल्हेवाट लावली.

काही नगरसेवकांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ, काहींनी त्यांच्या प्रभागातील चौकात, काहींनी प्रभागातील मंदिराच्या आजूबाजूला या टाईल्स लावण्याचे चित्र शहरात दिसत आहे.

रस्त्यांचीही दुर्दशा

प्रत्येक प्रभागातील रस्ते खड्डेमय रस्ते झाले आहेत. खासदार उन्मेष पाटील यांचे निवासस्थान शास्त्रीनगरात आहे. त्या प्रभागातही रस्त्यांची दुर्दशा आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचे निवासस्थान भडगाव रस्त्यावरील पूर्णपात्रे लॉन्ससमोर आहे, त्या भागातील रस्ते चांगले आहेत.

त्यातील काही भाग टाकळी प्र.चा.मध्ये आहे. खासदार, आमदार, माजी नगरसेवक, भावी नगरसेवक यांना शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पालिकेची मुदत संपून दीड वर्षे होऊनही राज्य सरकारने निवडणुका घेतलेल्या नाहीत. त्यामुळे ‘प्रशासक करेल ती पूर्व दिशा’ अशी परिस्थिती चाळीसगाव पालिकेची आहे.

"शहरात प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या घरापर्यंत योजनेतील पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत. नागरिकांनी ते त्वरित जोडून घ्यावे. पालिका याबाबत शोधमोहीम राबवणार असून, ज्यांनी पाइप जोडले नसतील त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येईल."

- राजेंद्र वाघ, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, चाळीसगाव पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT