Take care of your health and stay fit in winter! esakal
जळगाव

Winter Season : सकाळी थंडी अन् दुपारी कडक उन्हाने नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सकाळी हुडहुडी भरविणारी थंडी, दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव जळगावकर सध्या घेत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली, तरीही ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्याचा आनंद लुटायचा असेल, तर ‘फिट’ असायला हवे!

हिवाळा ऋतू खरेतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. कारण थंडीत प्रचंड भूक लागते. त्यामुळे आहारही चांगला राहतो. तंदुरुस्त राहण्यासाठीचा हा ऋतू; परंतु या काळात विषाणूजन्य आजार होण्याची शक्यताही असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. (Winter Season Citizens are shocked by cold in morning and hot sun in afternoon Jalgaon News)

त्यामुळे दिवाळीनंतर सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे, अशा तक्रारी डोके वर काढतात. तर ताप येणे, श्वसनविकार, दमा, कोरडा खोकला, अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. जळगाव जिल्ह्यात जसा कडक उन्हाळा असतो तशी तीव्र थंडीची लाटही येते.

अजून लाटेला उशीर असला, तरी हवामानातील बदलांमुळे या दिवसांत शीतपेय, गार पाणी, वातानुकूलित यंत्रणेमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादूर्भाव वाढतो. हवेतील प्रदूषणामुळे घसा दुखणे, याबरोबरच अन्य श्वसनाचे आजार उद्‌भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी थंडीत घराबाहेर पडताना गरम कपडे वापरावेत.

आहाराविषयी ही घ्या काळजी

-भाज्या, फळे भरपूर प्रमाणात खावीत. त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात. तीव्र हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते, म्हणून शेंगदाणे, गूळ, खजूर, असे शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खा, गरम आणि ताजे अन्न खा. अतिथंड गोष्टींचा समावेश आहारात करू नका

-रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे

-सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे, अशा तक्रारी डोके वर काढतात. ताप येणे, श्वसनविकार, दमा, कोरडा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते

-भाज्या, फळे भरपूर प्रमाणात खावीत. त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात. तीव्र हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते, म्हणून शेंगदाणे, गूळ, खजूर, असे शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खा

-गरम आणि ताजे अन्न खा. अतिथंड गोष्टींचा समावेश आहारात करू नका. रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे. हिवाळ्यात आहारात मीठ कमी प्रमाणात असावे.

"हिवाळा तसा आरोग्यदायी ऋतू आहे. मात्र, थंडी, धुक्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता जास्त असते. उबदार कपड्यांच्या वापराबरोबर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे."

-डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक

"थंडीच्या काळात सर्दी आणि तापाचे रुग्ण वाढू शकतात. या काळात उबदार कपड्यांबरोबरच आहारात पालेभाज्यांचा वापर वाढवावा. व्यायाम रोज करावा, पायी चालावे."

-डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT