Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वाहकाकडून महिलेची छेडखानी; बसमध्ये चढताना-उतरताना स्पर्श

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : राज्य परिवहन मंडळाच्या बस वाहकाने महिलेची छेड काढली. हा प्रकार धुळे-अमळनेर बसमध्ये घडलेल्या या प्रकाराचा जाब विचारला असता, वाहकाने वाईट पद्धतीने हातवारे केल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. (woman was molested by bus conductor jalgaon crime news)

धुळे-अमळनेर बसमध्ये गृहिणी अल्पवयीन मुलीसह प्रवास करत होती. वाहकाने बसमध्ये चढताना त्या महिलेस स्पर्श केला. चुकून हात लागला असावा, म्हणून महिलेने लक्ष दिले नाही. मात्र, या भामट्याने अमळनेर स्थानकात उतरतांना पुन्हा त्या महिलेस स्पर्श केला.

बसमधून उतरताना महिलेने त्याला शिव्यांची लाखोली वाहिली व आरडाओरड करत बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहकाने स्थानकातून बस पिटाळून नेली. घडलेल्या प्रकाराबाबत गृहिणीने अमळनेर बसस्थानकावर तक्रार देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, तक्रार ऐकून घेणारे सक्षम अधिकारी नव्हते. मात्र, पोलिस कर्मचाऱ्याने गृहिणीची आस्थेवाईक विचारणा केल्यावर घडलेला प्रकार सांगितला. मात्र, तो पोलिस इच्छा असूनही काही करु शकला नाही. कारण तो स्वतः संशयित आरोपी घेऊन बसस्थानकावर होता. तर, बस पालघर डेपोची होती आणि अमळनेरहून बस गेली होती.

"त्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली, तर पोलिस तपास करतील. त्या कर्मचाऱ्याची चौकशी होईल. कारवाई करता येईल. मात्र, खातरजमा करण्यासाठी किंवा त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी त्या कर्मचाऱ्याचे नाव सांगता येणार नाही." -धनंजय शिंदे, आगार व्यवस्थापक, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT