Accident News esakal
जळगाव

Jalgaon News : आयशरच्या धडकेत पडलेल्या तरुणास ट्रॅक्टरने चिरडले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण झाले असले, तरी बेशिस्त व भरधाव वाहतुकीमुळे महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. खोटेनगरजवळील वाटिकाश्रमसमोर भरधाव आयशरने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला.

त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने तरुण जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ६) दुपारी एकला घडली. (Young man hit by Eicher and crushed by a tractor Jalgaon Accident News)

प्रशांत भागवत तायडे (वय ३०, रा. गहूखेडा, ता. रावेर, जि. जळगाव) असे मृताचे नाव आहे, तर जयेश द्वारकानाथ पाटील (वय २३, रा. गहूखेडा, ता. रावेर) गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रशांत तायडे आणि जयेश पाटील दोघे मित्र चिंचपुरा (ता. धरणगाव) येथील आबासाहेब शिवाजीराव सीताराम पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निीकमध्ये मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. त्यांची परीक्षा सुरू आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

परीक्षेला जायला निघाले अन्‌

शुक्रवारी तिसरा पेपर असल्याने दोघे मित्र सकाळी गहूखेडा येथून दुचाकीने (एमएच १९, सीपी २३५५) जळगावमार्गे चिंचपुरा येथे जाण्यासाठी निघाले. दुपारी एकच्या सुमारास जळगावातील खोटेनगरजवळील वाटिकाश्रमासमोरील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरने (एमएच १९, सीवाय ८१६७) त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

त्यामुळे दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले. तेवढ्यात समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टर (एमएच १९, एएन २४३८) येत होते. त्या ट्रॅक्टरखाली आल्याने प्रशांत तायडेच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने जागीच ठार झाला.

तर मागे बसलेला जयेश गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. यात जखमी जयेश पाटील याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविले, तर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कुटुंबीयांचा आक्रोश

जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली. मृत प्रशांत तायडे यांच्या पश्चात आई साधना, वडील भागवत तायडे आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. एकुलता मुलगा गेल्याने प्रशांतचा मृतदेह पाहून आई, वडिलांनी प्रचंड आक्रोश केला.

ट्रॅक्टरवर लिफ्ट मागणारा जखमी

पाळधीहून येत असलेल्या ट्रॅक्टरवर एकाने जळगाव शहरात येण्यासाठी लिफ्ट मागितली. ट्रॅक्टरचालकानेही माणुसकी दाखवत लिफ्ट दिली. मात्र, काही वेळातच अपघातात त्या व्यक्तीला आपला पाय गमवावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT