जळगाव : शहरातील सम्राट कॉलनीत राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास (Suicide by hanging) घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली. अरविंद देविदास इंगळे (वय ३५, रा. सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी परिसर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Youth in Samrat Colony committed suicide by hanging jalgaon latest Marathi news)
शहरातील सम्राट कॉलनी परिसरात अरविंद इंगळे हा तरुण आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. वेल्डिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. शनिवारी रात्री १० वाजता घरात सर्वजण एकत्र जेवण करून झोपले होते.
रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याने घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा प्रकार त्याच्या घरच्यांना समजल्यानंतर त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.
रविवारी (ता. १७) रोजी सकाळी जिल्हा शायकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.