cyber police esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : बिझनेस लोनच्या नावे 24 लाखांत गंडविले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बिजनेस लोनच्या नावाखाली शहरातील तरुणाची २४ लाखांत फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयित पूजा चौहान (रा. मीरा रोड, पूर्व भाईंदर जि. ठाणे) हिला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सायबर पोलिसांनी चार दिवसांत अटक केली. ( youth was cheated of 24 lakhs In name of business loan jalgaon fraud crime news)

तिच्याकडून १६ लाख ६० हजारांची रोकड व तिच्या बँक खात्यातील दोन लाख, असे एकूण १८ लाख ६९ हजार रुपये हस्तगत करण्यात आले.

बँकेतून बोलत असल्याचे सांगत तुम्हाला ६० लाख रुपयांचे ऑनलाईन कार व बिजनेस लोन मंजूर करून देतो, असे सांगत तरुणाकडून ऑनलाईन जीएसटी टॅक्स, डॉक्युमेंट व आरटीआर आणि प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पूजा सुनील चौहान व महेश चव्हाण (रा. नाशिक) यांनी २४ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

याबाबत सायबर पोलिस ठाण्यात १४ फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषण करीत असताना पथक मीरा भाईंदर येथे रवाना केले. या पथकाने शनिवारी (ता. १८) मीरा भाईंदर येथून पूजा चौहान हिला ताब्यात घेतले.

तिची कसून चौकशी केली असता, तिच्याकडून १६ लाख ६० हजार रुपयांची रोकड जप्त केली व तिच्या बँक खात्यातील दोन लाख ९ हजार रुपये गोठविण्यात आले.

सायबर पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अवघ्या चार दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावला. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली लिलाधर कानडे यांच्यासह उपनिरीक्षक दिगंबर थोरात, राजेश चौधरी, ईश्वर पाटील, स्वाती पाटील, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT