shoot esakal
जळगाव

Web Series Shoot : जळगावात बोलीभाषेतील वेबसीरिजचे चित्रीकरण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात नर्मदास फ्यूचर फिल्मतर्फे खानदेशातील लेखकांनी लिहिलेल्या कथांवर आधारित व खानदेशातील कलावंतांना घेऊन ‘माझी बोली, माझी वेबसीरिज’ या एपिसोडिक वेबसीरिजचे शूटिंग सुरू झाले आहे. (shooting of episodic dialect web series 'Majhi Boli, Majhi Web Series' started jalgaon news)

या वेबसीरिजमध्ये प्रत्येक कथेचे लेखक वेगवेगळे असून, कथेतील कलाकारही त्या त्या अनुषंगाने बदलणार आहे. या वेबसीरिजचे वैशिष्ट म्हणजे लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि संपूर्ण टेक्निकल टीम खानदेशातीलच असून, त्याला जळगाव जिल्ह्यातील कलावंतांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ही वेबसीरिज पब्लिक फंडिंगच्या माध्यमातून तयार होत असून, वेबसीरिजसाठी एक निर्माता नसून अनेक निर्माते आणि दाते निर्मितीसाठी मदत करीत आहेत. या धर्तीवर होणारा हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

या वेबसीरिजचे दिग्दर्शक प्रशांत सोनवणे असून, त्यांनी आतापर्यंत ‘मायमाउली मनूदेवी’, ‘लढा शिक्षणाचा’, आणि ‘एक नंबरचा ढ’ चित्रपट तयार केले आहेत. तसेच त्यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून किरणकुमार अडकमोल आणि निर्मितीप्रमुख ऋषिकेश भरत धर्माधिकारी आहेत. याव्यतिरिक्त कॉश्चूमसाठी पूनम जावरे, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पवन इंद्रेकर, सागर अत्तरदे असून, कॅमेरा तेजस भंगाळे सांभाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

CM Devendra Fadnavis : सरकार दबावाने नव्हे, संविधानानुसार चालते; जीसीसीमध्ये पुणे देशात अव्वल ठरणार

विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, शिक्षकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच केला मंत्रोपचार, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT