काही सुखद

शरीराचा नसला, तरी मनाचा ‘पाय’ भक्कम

राजकुमार चौगुले

कोल्हापूर - नियतीने शरीर अपंग केले... पण मनाची खंबीर साथ होती... परिस्थितीने जसे चटके दिले तसे मनही पेटून उठले, कसल्याही परिस्थितीत हार मानायची नाही... निर्धाराने लढलो... आणि आज शरीराचा एक पाय अपघाताने गेला असला, तरी आहे ती परिस्थिती स्वीकारून ट्रॅक्‍टरने मशागत करीत जिद्दीने शेतीकामे करतो आहे... नांदणी (ता. शिरोळ) येथील रावसाहेब जांगडे (वय ५७) हे शेतकरी आपली जीवनकहाणी सांगत होते. 

घरची एकत्रित एक एकर शेती. पण, उत्पन्न पुरेसे होत नव्हते. यामुळे शेतमजुरीच जास्त केली. पाच वर्षांपूर्वी मशागतीसाठी लहान ट्रॅक्‍टर घेतला. आता मशागत करून संसार चालवायच्या सुखद विचाराने इतरांच्या शेतात मशागत सुरू केली. पण, ट्रॅक्टर घेतल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशी विपरीत घडले. उसाची भरणी करत असतानाच ट्रॅक्‍टर खाली दगड आल्याने ट्रॅक्‍टर अचानक फिरला. काही कळायच्या आतच उजवा पाय पूर्णपणे निकामी झाला. सगळेच संपले होते. पण, हरतील ते रावसाहेब कसले. लहानपणापासून कष्टाची कामे करत त्यांनी मनाचा खंबीरपणाही तयार केला. दोन महिने उपचार घेतल्यानंतर त्यांचे मन स्वस्थ बसेना. शेतीकामाची आवड सोडवेना. एक पाय नसला, तरी त्याचे दुःख नव्हते. आपण पुन्हा उभे राहायचे. हाच निर्धार होता. एखादा अपघात घडला आणि त्याची आठवण निघाली तर मनुष्याच्या मनात चर्र होते. पण, रावसाहेबांचा विचार वेगळा होता. ज्या ट्रॅक्‍टरच्या कामामुळे माझा पाय गेला. तेच काम मी पुन्हा करून दाखवेन हा निर्धार केला. खरे तर इतरांच्या दृष्टीने हे चमत्कारिक होते. एक पाय नाही हा काय पुन्हा ट्रॅक्टर चालविणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला. पण, जिद्दीने त्यांनी यावरही मात केली.

कृषी विभागाची साथ..
‌‌‌‌‌‌अपघातानंतर ट्रॅक्टर विकला होता. आता शेतीकामासाठी दुसरा घ्यावा लागणार होता. कृषी विभागाचे तत्कालीन शिरोळ तालुका कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, प्रशांत राजमाने आदी कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती कळली. रावसाहेबांची इच्छा पाहून कृषी यांत्रिकीकरण योजनेतून त्यांना ट्रॅक्टर मंजूर करून दिला. यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव स्वत: या कर्मचाऱ्यांकडून झाली. पाठबळ मिळाल्यानंतर रावसाहेबांनी इतर रकमेची जुळणी करीत सहा महिन्यांपूर्वी ट्रॅक्‍टर खरेदी केला.

ट्रॅक्‍टरमध्ये स्वत:  केले आवश्‍यक बदल 
जयपूर फुटच्या साह्याने ते सध्या फिरतात. ट्रॅक्‍टर घेण्यापूर्वीच काय बदल करावे लागतील याचा विचार त्यांनी केला होता. ट्रॅक्‍टर घेतल्यानंतर त्यांनी पायातील ब्रेकची रचना बदलली. गावातील फॅब्रिकेशन चालकांकडून त्याला हॅंड ब्रेक करून घेतले. काम सोपे झाले होते. ब्रेकसाठी पायाची अडचण नसल्याने मशागत करणे सुलभ झाले. आपण अपंग झालो आहोत, ही भावनाच त्यांच्या मनात येत नाही आणि यामुळे ते सर्वसामान्य मनुष्यासारखे आपले आयुष्य जगत आहेत. थोडे का होईना पण स्वत: कमवत आहेत. आज ते उसाची भरणी, सऱ्या पाडणे, फ्लॉवरची भरणी आदी कामे तिरपण, लेझरच्या साह्याने लीलया करतात. ते काम करत असताना पाहिले की ते अपंग आहेत आणि त्यांना त्याचा त्रास होत आहे, हे थोडेसुद्धा जाणवत नाही. मनात अपंगत्व नसेल तर कुठलाही काम सहज शक्‍य असल्याचे ते सांगतात. ट्रॅक्‍टरशिवाय ते किकची मोपेडही चालवतात. हाताने किक मारून ते गाडी सुरू करतात. पाय नाही ही जाणीवच मला कधी होत नाही, हे सांगताना त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच दिव्यांग व्यक्तींना मोठी प्रेरणा ठरतो. 

फक्त लढ म्हणा...
शेडवजा घरात रावसाहेब राहतात. अपघातानंतर गावातील अनेकांनी त्यांना मदत करून सामाजिक भान जपले. त्या पाठबळावर ते जीवन जगत आहेत. त्यांची परिस्थिती अजूनही नाजूक आहे. काम करण्याची जिद्द असली, तरी ट्रॅक्‍टरला लागणारी साधने मुबलक प्रमाणात नाहीत. याची त्यांना खंत आहे.  
रावसाहेब जांगडे- ९९२११८३६९८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT