10 Crore Sanctioned To Prevent Breakage Of Dams Ratnagiri Marathi News  
कोकण

धरणफुटी टाळण्यासाठी  'येथे' 10 कोटी मंजूर

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - तिवरे (ता. चिपळूण) धरणफुटी प्रकरणानंतर धोकादायक धरणाच्या सुरक्षेसाठी शासनाने शीघ्र पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 34 धरणांचा सर्व्हे झाला. यामध्ये धोकादायक ठरलेल्या 16 धरणांची दुरूस्ती आणि सुरक्षेसाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या धरणांची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करून ती सुरक्षित केली जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज. म. पाटील यांनी दिली. 

गेल्या पावसाळ्यात चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण फुटल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत धरणाखालील बाजूचे तिवरे गाव वाहून नामशेष झाले. या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकटी करण्यात आली. चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून या अहवालात धरण दुर्घटनेला जबाबदार कोण हे निश्‍चित होणार आहे.

तिवरे दुर्घटनेनंतर शासन खडबडून जागे झाले. खबरदारी म्हणून पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील 34 धरणांचे सर्वेक्षण केले. जुलै 2019 मध्ये सर्व धरणांना भेटी देऊन धरणांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात पाटबंधारे विभागाच्या 34 पैकी 16 धरणे धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या सोळा धरणांपैकी काही धरणांना गळत्या, सांडवा नादुरूस्त, गेट लिकेज यासारख्या समस्या होत्या. या सर्व बाबी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तपासणी अहवालात नमूद केल्या.

या धरणांच्या नादुरूस्तीचा प्रस्ताव तत्काळ राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. नादुरूस्त असलेल्या सोळा धरणांमध्ये पिंपळवाडी, मोरवणे, कोंडीवली, कळवंडे, खोपट, निवे-तेलेवाडी, चिखलगाव, वेळगवाने आदी सोळा धरणांचा समावेश होता. पाटबंधारे विभागाने पाठवलेल्या धरण दुरूस्तीच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेऊन धरण सुरक्षेसाठी 10 कोटीचा निधी मंजूर केला. या दहा कोटीपैकी नऊ कोटी सिव्हिल वर्क तर एक कोटी यांत्रिकी कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. सोळा धरणांच्या दुरूस्ती कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून लवकरच धरण दुरूस्तींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व धरणांची दुरूस्ती केली जाईल. तसेच सोळा धरणांवर देखभालीसाठी एजन्सीदेखील नियुक्त करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT