aakansha salvi kathak dancer in the rotary multi district solo dance competition with first prize in ratnagiri
aakansha salvi kathak dancer in the rotary multi district solo dance competition with first prize in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा साळवी देशात प्रथम

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : रोटरी क्लब चाणक्य, रोटरी डिस्ट्रिक्ट 3250 आयोजित 'रोटरी मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स कॉम्पिटिशन' या देशपातळीवरील स्पर्धेत रत्नागिरीच्या आकांक्षा हिराकांत साळवी हिने देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमामालिनी, तसेच बिहार येथील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सुदीपा घोष यांच्या उपस्थितीत अंतिम स्पर्धा पार पडली. 

आकांक्षा ही कथ्थक नृत्यगुरू सोनम जाधव यांची शिष्या आहे. रोटरी क्लब चाणक्य, रोटरी डिस्ट्रिक्ट 3250 यांच्यातर्फे संपूर्ण देशातील 16 रोटरी डिस्ट्रिक्टकरिता रोटरी कुटुंबीय व विशेष वर्गवारीतील मुलांची 'रोटरी मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स कॉम्पिटिशन' आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशभरातून 560 स्पर्धक सहभागी झाले होते. आकांक्षाने स्पर्धेकरिता शिवपंचाक्षरीचा व्हिडिओ पाठवला होता. त्यातून तिची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. 

अंतिम फेरीसाठी देवी स्तुती सादर केली होती. या नृत्याचे हेमामालिनी व सुदीपा घोष यांनी कौतुक केले. यावेळी रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरीयन शेखर मेहता उपस्थित होते. रोटरी क्लब रत्नागिरी मीडटाउनचे खजिनदार रोटे, हिराकांत गोपीचंद साळवी व सायली हिराकांत साळवी यांची आकांक्षा ही कन्या. गेली आठ वर्षे ती नटराज नृत्यवर्गात सोनम जाधव यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे घेत असून आता विशारदच्या अंतिम वर्षाला आहे. तिच्या यशामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली. या स्पर्धेतकरिता गौरी साबळे, ईशा साळवी, व्हिडिओग्राफर नीलेश कोळंबेकर, ऋषिकेश लांजेकर, मिनी हॉलचे संचालक सुदेश शेट्ये, रत्नागिरी मीडटाउनचे प्रेसिडेंट रोटे प्रसाद खेडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

"प्रचंड मेहनत, सातत्य आणि नृत्यातील एकाग्रता हे आकांक्षाच्या यशाचे गमक आहे. नटराज कथ्थकनृत्य वर्गाबरोबरच आपल्या रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले आहे. मला तिचा अभिमान वाटतो."

- सोनम जाधव, नृत्यगुरु

"लहानपणापासून नृत्य शिकतेय. याकरिता आईवडिलांसह सोनमताईंचे कष्ट आहेत. या स्पर्धेमुळे सुदीपा घोष आणि हेमामालिनी यांच्यासारख्या ज्येष्ठ नृत्यगुरूंसोबत थेट बोलता आले. त्यांच्यासमोर कला सादर करता आली, याचे खूप समाधान आहे. या यशामुळे शास्त्रीय नृत्याचे महत्त्व अधोरेखित होण्यास मदत होईल."

- आकांक्षा साळवी

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT