accident esakal
कोकण

मुंबईहुन गोव्याकडे निघालेली चारचाकी कोसळली नदीत; दोघे जखमी

घटनास्थळी पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेतली आहे.

एकनाथ पवार

घटनास्थळी पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेतली आहे.

वैभववाडी : शुकनदीच्या (Shuk River) पुलावरून ७० फुट खोल नदीत कार कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. सुदैवाने या अपघातात चारचाकीतील पाचही जण बचावले असुन दोघेजण जखमी आहेत. मुंबईहुन गोव्याकडे (Mumbai -Goa) निघालेली एक चारचाकी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एडगाव येथे आली. (Sindhudurg) वैभववाडीच्या दिशेने येत असताना शुकनदीच्या पुलावरून कार कोसळली. ७० फुट खोल नदीत पात्रात जावुन कार थांबली. या भीषण अपघाताची माहीती मिळताच तेथे लोकांनी मोठी गर्दी केली. (Konkan News) घटनास्थळी पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेत कारमधील सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.

दरम्यान, अपघातादरम्यान कारमध्ये एकुण पाचजण होते. त्यापैकी दोघेजण जखमी झाले आहेत. (Accident news) त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात सुदैवाने कारमधील पाचही जण बचावल्यामुळे अपघात पाहणाऱ्या सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले. अपघातात एअरबॅगमुळे जिवीत हानी टळल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT