Bahadur Shaikh Naka Flyover Collapsed esakal
कोकण

Chiplun : बहादूरशेख नाक्यावर उड्डाणपुलाचे 30 गर्डर कोसळले; मंत्री चव्हाणांनी दिले चौकशीचे आदेश, दोषींवर होणार कारवाई

बहादूरशेख नाका (Bahadur Shaikh Naka Chiplun) येथे गर्डर कोसळून झालेला अपघात ही दुर्दैवी घटना आहे.

सकाळ डिजिटल टीम

तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.

चिपळूण : बहादूरशेख नाका (Bahadur Shaikh Naka Chiplun) येथे गर्डर कोसळून झालेला अपघात ही दुर्दैवी घटना आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, हे आपले सुदैव. राष्ट्रीय महामार्ग (National Highway) प्राधिकरणाच्या गुप्ता, सिन्हा व मिश्रा या तिघांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मंगळवारी पहाटे शहरातील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन मुंबई-गोवा महामार्गावरील नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, ‘‘काल झालेली घटना ही दुर्दैवी आहे. दोन किमीचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे गरजेचे आहे. तीन तज्ज्ञ लोकांची समिती याची तपासणी करून अहवाल देईल. सुरक्षिततेच्यादृष्टीने वर असणारे गर्डर काढणे हे देखील महत्त्वाचे आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील गोवा-मुंबई महामार्ग गतीने झाला पाहिजे, यासाठी बैठक घेऊन सूचना केली होती. त्याबाबतची समस्यादेखील मार्गी लावली होती.’’

पुलाच्या चौकशी संदर्भात पत्रकारांशी बोलताना मंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या पुलाची कामे गर्डरद्वारे केली जातात. त्यासाठी स्पॅन्स वायर बनवले जातात. ते एकमेकाला जोडून गर्डरद्वारे वरती बसवतात. हे काम करत असताना मोठा आवाज झाला होता. त्यावेळी पुलाच्या कामात काहीतरी अडचण झाल्याचा अंदाज आला. त्यामुळे पुलाजवळ कोणीही मजूर किंवा अन्य लोक राहणार नाहीत याची काळजी घेतली होती.

मात्र, दुपारी पुलाचे गर्डर कोसळले. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकाराची सखोल चौकशी होणार आहे. हे करत असतानाच कोसळलेले गर्डर कापून तेथील भाग मोकळा केला जाणार आहे. तेथील माती बाहेर काढण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरू केले जाईल. या चौकशीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी अजूनही किती कालावधी लागेल याची वेळ ठरवलेली नाही.’’ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत आदी उपस्थित होते.

महामार्ग व्हायला हवाच

मुंबई-गोवा महामार्ग व्हायला हवा, ही प्रत्येकाची भावना आहे. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत सुरक्षितता हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का? त्याबाबत शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगतिले.

कामगारांची दिरंगाई कारणीभूत?

हा पूल २ किलोमीटरचा आहे. त्या पुलाच्या एका बाजूने चढ आहे. त्यामुळे पुलाचे डिझाईन बनवताना कोणती अडचण झाली आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने तपास केला जाईल. या पुलासाठी बनवलेले सर्व पिलर चांगल्या स्थितीत आहेत. पिलरवर स्पॅन ठेवण्याचे काम करताना कामगारांच्या माध्यमातून दिरंगाई होताना अनेक ठिकाणी पाहायला मिळते. चिपळूणातील या पुलाच्या ठिकाणीही तसेच काहीतरी घडले असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind Vs SA 2nd Test : भारतीय खेळाडूंची दाणादाण, गौतमच्या निर्णयांमुळे अवस्था 'गंभीर', चाहत्यांना आठवला ग्रेग चॅपलचा काळ

Kolhapur TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीचा भंडाफोड! गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश; माध्यमिक शिक्षकांवर संशय वाढला

Latest Marathi News Live Update : अयोध्येत राम मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

Mumbai News: ‘घर-घर राम’ अभियान सुरू! घराघरात धर्मध्वज फडकवण्याचे भाजपचे आवाहन

Nagpur Kidnapping Case: स्कूल बसने गेला, पण परतलाच नाही; भावेशच्या आई-वडिलांचा आक्रोश, सावनेर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT