boat esakal
कोकण

स्थानिकांना बंदी; घुसखोर मच्छीमारांना संधी

गस्ती नौका ठरते दुबळी; मुंबईकरही लागले घुसू, स्पीड बोट हवी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : नव्या मासेमारी कायद्याने पर्ससीन मासेमारी(Persian fishing) थांबली आहे; मात्र येथील सहायक मत्स्य व्यवसाय संचालक(Assistant Fisheries Director) विभागाकडे असणारी गस्ती नौका परप्रांतीय हायस्पीड बोटीपुढे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे स्थानिकांना बंदी आणि परराज्यातील घुसखोर मच्छीमारांना संधी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परराज्यातील मच्छीमारांचा महाराष्ट्र सागरी जलदीमध्ये धुडगूस सुरू असल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये प्रचंड संताप आहे. (ratnagiri news )

राज्यात गेल्या महिन्यापासून नवीन मासेमार कायदा लागू झाला आहे; मात्र या कायद्यामध्ये अनेक अटी जाचक आणि पर्ससीन मासेमारी मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे, असा आक्षेप घेत, पर्ससीन संघटनांनी येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालकांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या सर्व घडामोडीमुळे परप्रांतीयांचे चांगलेच फावले आहे. गस्ती नौकेबाबतची दुबळी बाजू पाहून घुसखोरांची चांदी झाली आहे. जिल्ह्यातील दाभोळ, रत्नागिरी, जयगड आदी भागांमध्ये आता मुंबईकरांनीही घुसखोरी सुरू केली आहे. येथील गस्ती नौका जुनी आहे. भाड्यापोटी लाखो रुपये खर्च केले जात असून त्याचा अपेक्षित उपयोग होत नाही. परराज्यातील जास्त अश्वशक्तीच्या नौका गस्तीनौकेच्या समोर मासेमारी करतात. गस्ती नौका पोहचेपर्यंत घुसखोर तेथून निसटतात.

घुसखोरी रोखण्यासाठी स्पीड बोट मिळावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, अजून त्यावर काही निर्णय न झाल्यामुळे भाड्याची मच्छीमारी नौका घेऊन गस्त करावी लागते. घुसखोरांना पकडताना या नौकेचा फारसा उपयोग होत नाही.

-एम. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य संचालक, रत्नागिरी

मत्स्य व्यवसाय सक्षम करण्याची गरज

२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर सागरी गस्त (Marine patrol)वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस घुसखोरी किंवा बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई करून ती मत्स्य विभागाच्या ताब्यात देत आहेत. घुसखोरी रोखण्यातील अपयशाने स्थानिक मच्छीमार भरडले जात आहेत. अनेकवेळा पत्रव्यवहार करून स्पीड बोट मिळालेली नाही.

एक नजर...

  1. परप्रांतीय हायस्पीड शक्तीमान बोटी(highspees boat)

  2. गस्ती नौका पोहचेपर्यंत निसटतात

  3. दाभोळ, रत्नागिरी, जयगडात आक्रमण(kokan news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; 'एसआयटी'कडे तक्रार

IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात ६ लाखांचे 'MD' ड्रग्ज जप्त

SCROLL FOR NEXT