nitesh rane
nitesh rane esakal
कोकण

बँकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणार ; नितेश राणेंची ग्‍वाही

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : सहकार वाढविण्याचे काम जिल्‍हा बँकेकडून अपेक्षित आहे; पण काही विद्यमान संचालक आणि आमच्या विरोधात निवडणूक लढविणारे पॅनेलचे उमेदवार हे सहकार क्षेत्र संपविण्यासाठीच कार्यरत आहेत, असा आरोप भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli)यांनी आज केला. जिल्‍हा बँकेच्या (Bank) सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेणार असल्‍याची ग्‍वाही आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली.

येथील प्रहार भवन येथे जिल्‍हा बँक निवडणुकीतील सिद्धीविनायक सहकार पॅनेलतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आमदार नीतेश राणे, भाजप जिल्‍हाध्यक्ष आणि सिद्धीविनायक पॅनेलचे उमेदवार राजन तेली, अतुल काळसेकर, प्रज्ञा ढवण, कमलाकांत कुबल आदी उपस्थित होते.

तेली म्‍हणाले, ‘सहकार हा वाढायला हवा; पण निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या विरोधातील मंडळी सहकार संपावायला निघाले आहेत. बँकेचे अध्यक्ष आणि काही संचालकांनी अनेक विकास सोसायट्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले आहे. यापूर्वी जिल्ह्यात १९६ पतसंस्था होत्‍या; मात्र त्‍या आता १४० झाल्‍या आहेत. त्‍यामुळे जिल्‍हा बँकेत सत्ताधारी असलेली मंडळी सहकार क्षेत्र संपविण्यासाठी कार्यरत आहे.’’

आमदार राणे म्‍हणाले, ‘‘आम्‍ही विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी नाही तर आम्‍ही रोजगार, सहकार, शेती, मच्छीमारी, महिला यांच्यासाठी काय करू शकतो याची माहिती घेऊन मतदारांपुढे जात आहोत. मागील पाच वर्षात जिल्‍हा बँकेने अनेक रोजंदारी कर्मचारी नेमले; पण त्‍यांची कुठेही नोंद नाही. त्‍यांची फसवणूक करण्याचे काम बँकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून झाले आहे; मात्र आमचे पॅनेल सत्तेवर येताच या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना आम्‍ही कायमस्वरूपी सेवेत घेणार आहोत.’’सिद्धीविनायक सहकार पॅनेल सहकारात काम करणाऱ्या सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढवतोय. आमच्या पॅनेलला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. जिल्‍हा बँक २००८ पासून राणेंच्या नेतृत्‍वाखाली काम करतेय. गेल्‍या बारा वर्षातील विकासाची जी कामे झाली, ठेवी वाढल्‍या, बँकेचा टर्नओव्हर वाढला. ही सर्व राणेंच्या नेतृत्‍वाखालीच मिळाली आहेत; मात्र आमचे विरोधक ही सर्व कामे आपल्‍या जाहीरनाम्‍यात वापरली आहेत, अशी टीका राजन तेली यांनी केली.

आमचे विरोधक राणेंपासून बँक वाचवायची आहे, असा प्रचार करत आहेत; पण चौदा वर्षांत ८०० कोटींवरून पाच हजार कोटींपर्यंतची बॅँकेची उलाढाल राणेंच्या नेतृत्‍वाखाली झाली आाहे. मोठ्या संस्थांना शेकडो कोटींच्या कर्जापासून छोटेमोठे उद्योजक, शेतकऱ्यांना राणेंच्या नेतृत्‍वाखालील बँकेने आर्थिक साहाय्य दिले आहे. त्‍यामुळे राणेंपासून नव्हे तर आमच्या विरोधात प्रचार करणाऱ्या चोरांपासून बँक वाचविण्याची वेळ आली आहे.

अतुल काळसेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT