BJP launches kamal thali in sindudurg kokan marathi news
BJP launches kamal thali in sindudurg kokan marathi news 
कोकण

सावंतवाडी सुरू होणार कमळ थाळी ; राजन तेली

सकाऴ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : कणकवली देवगड प्रमाणे आता सावंतवाडी शहरातही भाजपा तर्फे कमळ थाळी सुरू करणार आहे. बुधवार पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. ही घोषणा भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी केली. पहिल्या दिवशी ही थाळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी प्रायोजित केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी सावंतवाडी नगरपालिका येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


सिंधुदुर्गात सापडलेला कोरोनाचा एकमेव  पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाला आहे त्यानंतर कोणताही नवीन रुग्ण आढळून आला नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी आपण प्रशासनाकडे व मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, राजू बेग, मनोज नाईक, आनंद नेवागी, समृद्धी विर्णोडकर,  उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर आदी उपस्थित होते.

बॅरिस्टर नाथ पै सभागृहालगत मिळणार थाळी

 कणकवलीचे भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमांतून जिल्ह्यात प्रथमच कमळ थाळी सुरू करण्यात आली. त्यानंतर  रोज देवगड वैभववाडी व आता सावंतवाडी तही कमळ थाळी सुरू करण्यात येणार आहे. बुधवारपासून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असून पहिल्या दिवशी चितळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी प्रायोजित केली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
लॉक डाऊन ची मुदत संपेपर्यंत रोज 300 लोकांना या थाळीचा लाभ मिळणार आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहालगत ही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

 ३०० जणांची सेवा कमिटी स्थापन
देशात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती व सुरू करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा या पार्श्वभूमीवर स्थानिक तसेच परप्रांतीयांना होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या जिल्हा भाजपा च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. यात 2 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत सुमारे 25 हजार 613 लोकांना धान्य वाटप करण्यात आले. तसेच 76 हजार 818 मास्क जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांना वाटण्यात आले. भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यातील 878 गावांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तर भाजपच्या 1990 सदस्यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत केली. तसेच रुग्णांसाठी आवश्यकता भासल्यास रक्तदान करण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ४५५ लोकांनी भाजपकडे नाव नोंदणी केली आहे.अशी माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील लोकांना विविध स्तरावर मदत व्हावी यासाठी भाजपतर्फे ३०० जणांची सेवा कमिटी स्थापन करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून विविध सेवा कार्य सुरू आहे. 
सावंतवाडीत सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर उद्भवलेली परिस्थिती जमलेला जमाव व झालेली मारहाण त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राजन तेली यांनी या प्रकरणाची पोलिसांनी कोणताही दुजाभाव न करता निपक्षपणे चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आपण पोलिसांकडे केली आहे, अशी माहिती ही  त्यांनी यावेळी दिली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT