coronaviras impact Four young boy in Madurai stranded in Iran kokan marathi news
coronaviras impact Four young boy in Madurai stranded in Iran kokan marathi news 
कोकण

Coronaviras: इराणमध्ये अडकलेल्या या 9 युवकांना भारतात येण्याची लागली आस....

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मडुरा-रेखवाडी येथील ४ व गोव्यातील ५, असे एकूण ९ युवक इराणमध्ये अडकले आहेत. त्यांनी मदत करावी व भारतात परत न्यावे, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी कुटुंबीयांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला आर्त साद घातली असून लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी केली. मडुरा व गोवा येथील सागर पंडित, विकास सुतार, उदय पाटकर, विनोद परब, अजय परब, रोहन पेडणेकर, मितेश राऊळ, नितीन गावडे, सचिन कळंगुटकर या युवकांचा यामध्ये समावेश आहे.

येथील विमानसेवा बंद असल्याने या युवकांच्या सुटकेसाठी प्रयत्न होण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.कोरोनामुळे येथील विमानतळ बंद ठेवल्याने या तरुणांची भारतात येण्याची शक्‍यता सध्यातरी नसल्याचे सांगण्यात आले. हे सर्व युवक गेले काही दिवस एका खोलीमध्ये असून त्यांना जेवणाचे साहित्य कंपनीकडून पुरविण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ व गोव्यातील ५ तरुण हे जीकेबी कंपनीच्या माध्यमातून इराणमध्ये नोकरीसाठी गेले आहेत.

 मदतीसाठी समाजमाध्यमांचा वापर

हे तरुण इराणची राजधानी तेहरानमध्ये गेली २ वर्षे राहत आहेत. १४ मार्चला हे सर्व युवक भारतात परतणार होते. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती; मात्र अचानक इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या युवकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहेत. भारतात ६३ रुग्ण हे बाधित आढळल्याने सर्वाधिक झळ बसलेल्या देशातील विमानसेवा अनिश्‍चित कालावधीसाठी बंद केली आहे. येथील युवक इराणमध्ये अडकल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली आहे. या युवकांनी समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित करून तेथून भारतात आणण्याची विनंती केली आहे.

भारतीय दुतावासांनी केली टाळाटाळ
तेहरानमध्ये या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने येथील संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. येथील प्रवासी वाहने व वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याने तेहरान शहरात अघोषित संचारबंदी निर्माण झाली आहे.तेथे अडकलेले येथील युवक हे कंपनीने दिलेल्या खोलीत एकत्रित राहतात. शहरात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने या युवकांना खोलीच्या बाहेर येण्यासही बंदी घातली आहे. त्यांना जेवणाचे साहित्य इतर जीवनावश्‍यक वस्तू दररोज खोलीत आणून देण्यात येतात. गेले काही दिवस या युवकांनी खोलीच्या बाहेरील जग बघितले नाही. सुरुवातीला या युवकांनी भारतीय दुतावासात संपर्क साधून भारतात परत नेण्याची विनंती केली होती; मात्र ही विनंती फेटाळत या युवकांना दूतावासातील अधिकाऱ्यांनी भेटण्यासही नकार दिल्याचे युवकांनी सांगितले.

 हेही वाचा-खेड मध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ....

आमदार राणे यांची तत्परता
इराणमध्ये अडकलेल्या युवकांनी मदतीसाठी आमदार नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला आहे. आमदार राणे यांनी नवी दिल्ली येथील परराष्ट्र कार्यालयात तत्काळ संपर्क साधून अडकलेल्या युवकांची माहिती दिली. इराणमधील भारतीय दूतावास कार्यालय अडकलेल्या युवकांना मदत करत नसल्याची तक्रार केली आहे. उद्या (ता.१३) भारतीय दूतावासातील अधिकारी युवकांना संपर्क साधणार असल्याचे आश्‍वासन आमदार राणे यांनी युवकांना दिले आहे. आमदार राणे या युवकांच्या सातत्याने संपर्कात आहेत.

इराणमध्ये  दरदिवशी एक हजारहुन अधिक रुग्ण
इराणमध्ये करोना विषाणू वेगाने पसरत असून येथील आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. दरदिवशी एक हजारहुन अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत इराणमध्ये शेकडो लोक या विषाणूचे बळी ठरले आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इराण सरकार प्रयत्नशील आहे; मात्र आरोग्य यंत्रणा प्रभावी नसल्याने व पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. येथील परिस्थिती भयावह असून लवकरात लवकर मायदेशी परतण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत ही विनंती.
- सागर पंडित, इराणमध्ये अडकलेला युवक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT