cyber sports university in the maharashtra state kokan marathi news
cyber sports university in the maharashtra state kokan marathi news 
कोकण

खुशखबर : राज्यात होणार सायबर, क्रीडा विद्यापीठ : उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : वाढत जाणाऱ्या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबर विद्यापीठ, पुढील १०-१५ वर्षांत देशाचे नाव ऑलिम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रीडा विद्यापीठ लवकरच उभारले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात १०व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात सामंत बोलत होते.

लवकरच सायबर विद्यापीठ

या सत्राचा विषय विद्रोह, दहशतवाद व नक्षलवादाशी संघर्ष-कारणे व आव्हाने हा होता. या सत्राचे अध्यक्ष ओडिशाचे विधानसभा अध्यक्ष डॉ. सुजोय पात्रो होते. या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन. टी. राव हे उपस्थित होते. सामंत म्हणाले, भविष्यात आतंकवाद्यांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. त्याचा सामना तरुणांनी करावा यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सायबर विद्यापीठ सुरू करणार आहे.

देशातील प्रत्येक मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे

यासोबतच राज्यात उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत यासाठीही क्रीडा विद्यापीठ सुरू केले जाईल. विद्यार्थीदशेत दिले जाणारे संस्कार हे आयुष्यभर सोबत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये राष्ट्रगीत गाण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात २० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी रोज राष्ट्रगीत म्हणतात. युवकांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालय अल्कोहोलरहित व रॅगिंगरहित करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. देशातील 
प्रत्येक मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही सामंत म्हणाले. एमआयटीने सुरू केलेल्या या छात्र संसदेला राज्य शासनाचा पाठिंबा असून पुढील वर्षापासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये असा उपक्रम राबविण्यासाठी राज्यशासन सहकार्य करणार असल्याची ग्वाही सामंत यांनी या वेळी दिली.

आदर्श युवा आमदार सन्मान
या वेळी सामंत यांना ‘आदर्श युवा आमदार सन्मान’ ने गौरविण्यात आले. मणिपूरचे आमदार के. लिसिया, दिल्लीचे सौरभ भारद्वाज यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT