Konkan Water Scheme esakal
कोकण

'कोकणच्या वाट्याचं पाणी मराठवाड्याला वळवण्याचा विचार'; अजितदादांच्या 'त्या' वक्तव्यानंतर चर्चेला फुटणार तोंड?

मुंबई-पुण्यात १ दिवस नळाला पाणी आले नाही तर ओरड होते.

सकाळ डिजिटल टीम

कृष्णा खोऱ्यामधून मराठवाड्याला हक्काचं २५ टी.एम.सी. पाणी पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणामुळे गेल्या २५ वर्षांत मिळालं नाही.

रत्नागिरी : कोकणातील (Konkan) समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याच्या (Marathwada) गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात मांडला; परंतु ही योजना आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या परवडणारी नाही, असे स्पष्ट मत अॅड. पाटणे यांनी व्यक्त केले.

समुद्रसपाटीपासून कोकणची उंची सर्वसाधारणपणे ८० मीटर, रत्नागिरीची ५८ मीटर तर मराठवाड्याची उंची ५६८ मीटर आहे. म्हणूनच खताळ कमिशनने अहवालात योजनेला विरोध केला होता. कोकणच्या वाट्याचं पाणी वळवलं तरीही मराठवाडा तहानलेलाच राहील. जनतेला स्वप्नात गुंतवून काहीच निष्पन्न होणार नाही, असेही कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले.

तर येथील वशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरविण्याकरिता शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोकणचे पाणी वळवण्याचा विषय अधूनमधून चर्चेला येत असतो. उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या वक्तव्यानंतर पून्हा एकदा चर्चेला तोंड फुटणार आहे.

याबाबत अभ्यासक पाटणे म्हणाले, कोकणची गरज भागवून मराठवाड्याला प्यायला पाणी देणे हे न्यायाचे होईल; परंतु पाणी उसासाठी देणे कोकणवर अन्याय होईल. पाणी ज्या प्रदेशातून वाहते तेथील जनतेचा पाण्यावरचा समान हक्क रिपरिअन राइट प्राधान्याने मान्य केला पाहिजे. कोकणातील आया-बहिणींच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरविण्यासाठी सरकार कार्यक्षम उपमुख्यमंत्री न्यायाची भूमिका घेतील, अशी अपेक्षा आहे.

मुंबई-पुण्यात १ दिवस नळाला पाणी आले नाही तर ओरड होते. परंतु कोकणातील महिला हंडाभर पाण्याकरिता १ ते २ किलोमीटर उन्हातून पायपीट करते. याची वेदना कोणालाच नाही. कोयना धरणाचे काम पूर्ण होऊन ५० वर्षे होत आली. हेळवाक येथून वाशिष्ठी नदीत वाहून जाणारे पाणी साधारण: १९०० दशलक्ष घनमीटर इतके आहे.

१९५२ मध्ये पंडित नेहरूंनी वीज निर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा काय उपयोग करायचा, असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर कोकणी माणूस अद्याप शोधतो आहे. लोटे- परशुराम येथील एम.आय.डी.सी. व एन्रॉन वगळता सर्व कोयनेचे पाणी वाशिष्ठीमार्गे दाभोळ येथे समुद्राला मिळते. येथील वशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरविण्याकरिता शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.

दरम्यान, जागतिक दर्जाच्या जलतज्ज्ञांनी पशुपालनाच्या क्षेत्रात मराठवाडा डेन्मार्क बनू शकण्याची क्षमता आहे. दुधाच्या व पशुपालनाच्या व्यवसायात आर्थिक प्रगती असताना आपण उसाच्या मृगजळाच्या मागे लागलो आहोत. तर महाराष्ट्रातील १७३ साखर कारखान्यांपैकी ८० कारखाने या दुष्काळी पट्ट्यातच आहेत. उसाच्या अति लागवडीमुळे मराठवाडा वाळवंटी भूप्रदेश होईल, असे जलतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

कृष्णा खोऱ्यामधून मराठवाड्याला हक्काचं २५ टी.एम.सी. पाणी पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणामुळे गेल्या २५ वर्षांत मिळालं नाही, कालवे बुजून गेले. कृष्णेचं एक थेंबही पाणी मिळालं नाही. मराठवाड्याचा ९६ टक्के प्रदेश गोदावरीच्या खोऱ्यात मोडतो. गोदावरीचा न्यायोचित वाटा मराठवाड्यात मिळाला नाही.

- ॲड. विलास पाटणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT