development of direction in Sindhudurg kokan marathi news 
कोकण

मुख्यमंत्री सिंधुदुर्गला कोणती देणार भेट ...? वाचा....

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदूर्ग) : महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर विकास प्रक्रियेतील काही कामांना ब्रेक लागला आहे; मात्र जिल्ह्यात काही वर्षांपासून रखडलेल्या सी-वर्ल्ड प्रकल्प, विमानतळ, मिनी एमआयडीसी या प्रकल्पांचे भवितव्य लवकरच ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १७ फेब्रुवारीला आंगणेवाडीतील भराडी मातेच्या दर्शनासाठी येणार आहेत. यादरम्यान जिल्ह्याच्या विकासकामांवर मिनी मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्‍यता आहे.

यात जिल्ह्यातील रखडलेल्या कामांबाबत ठोस निर्णय होतील किंवा जिल्ह्याला एक मोठा प्रकल्प मिळण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारसमोर आर्थिक डोलारा सांभाळण्याचे मोठे आव्हान आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी विकास योजनांना स्थगिती दिली होती. सरकार आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे काही विकास योजना बंद केल्या गेल्या.

मोठ्या योजनांना दिला ब्रेक

आता यातील बहुतांश योजना सुरू झाल्या आहेत; मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून मोठ्या योजनांना ब्रेक दिला आहे. शिवसेना आणि सिंधुदुर्ग हे आगळेवेगळे नाते सर्वश्रुत आहे किंवा कोकण आणि शिवसेना म्हणजे वर्षानुवर्षे जुळलेली नाळ म्हणता येईल. कोकणच्या भल्यासाठी रत्नागिरी ग्रीनरिफायनरी प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली. त्यामुळे कोकणच्या पदरात नेमकं काय पडणार? याची उत्सुकता आहे.

विनाशकारी प्रकल्प लादले

आजवर राज्यामध्ये आलेल्या विविध प्रकारच्या सरकारांनी कोकणच्या निसर्गसंपन्न संपत्तीवर घालण्याचा प्रयत्न केला. अनेक विनाशकारी प्रकल्प लादले गेले; पण शिवसेनेने याला ठाम विरोध करत हे प्रकल्प परतून लावले परंतु आर्थिकदृष्ट्या कोकणचा विकास करण्यासाठी नव्या प्रकल्पांची गरज आहे. पर्यावरण समृद्धी अबाधित ठेवून हे प्रकल्प पूर्णत्वास जातील अशी अपेक्षा आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा युतीशासन काळामध्ये देशातला पहिला पर्यटन जिल्हा घोषित करण्यात आला; पण आज या जिल्ह्याच्या पदरात निराशाच आहे.

विमानतळाची प्रक्रिया रखडली
कोकणने भरभरून प्रेम दिलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने जिल्ह्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पर्यटन विकासासाठी गरजेचा सी-वर्ल्ड प्रकल्प वादात अडकला आणि या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात गेले. भूसंपादन झाले आहे; पण अनेक अडचणींमुळे हा प्रकल्प अजूनही कागदावर आहे. याचबरोबर चिपी विमानतळ इथल्या पर्यटन व्यवसायाला बळ देणारा ठरणार आहे. देशातले आणि परदेशातील पर्यटक थेटपणे सिंधुदुर्गात येण्यासाठी विमानतळ उभारण्यात आला. हा विमानतळ कार्यान्वित होण्याची प्रक्रिया गेली दोन वर्षे रखडली आहेत. याबाबतही ठोस निर्णय अपेक्षीत आहेत. १७ ला होणाऱ्या बैठकीत जिल्ह्याला चालना देणारे विविध निर्णय अपेक्षित आहेत.

सिंधुदुर्गाला मोठा प्रकल्प?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांमध्ये सिंधुदुर्गसाठी काहीतरी मोठं विकासाचं काम देणे, हे हे निश्‍चित ठरलेला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गसाठी काय द्यावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे १७ फेब्रुवारीच्या दौऱ्यात मुख्यमंत्री सिंधुदुर्गला कोणती भेट देणार याची उत्सुकता आहे.

मंत्रिमंडळाची मिनी बैठक
मुख्यमंत्री ठाकरे आंगणेवाडीच्या भराडी देवी दर्शनानंतर तेथील एका लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयात मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री जे उपस्थित असतील, त्यांची मिनी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचा आढावा घेतला जाण्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू झाली आहे.

रखडलेले प्रकल्प असे...
 बहुचर्चित सी-वर्ल्ड प्रकल्प 
 चिपी विमानतळ 
 आडाळी मिनी एमआयडीसी 
 सिंधुदुर्गनगरी आयटी हब 
 मत्स्यबीज उत्पादन
 कोकण मेवा प्रक्रियाउद्योग
 एमटीडीसीची निवासस्थाने 
 किनारपट्टीवरील संरक्षण
 ऐतिहासिक किल्ल्यांचे सुशोभीकरण 
 कोकणचा सागरी महामार्ग
 सह्याद्री महामार्ग 
 कोल्हापूरला जोडणारे सुरक्षित घाटमार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT