family refused entry who women with three month child sawantwadi 
कोकण

तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन ती दारात उभी, तिला घरात घेतलं नाही!

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - तीन महिन्यांच्या बाळासह नवी मुंबईतून सूनबाई सावंतवाडी तालुक्‍यातील एका गावात आली; पण घरच्यांनीच प्रवेश नाकारला. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन व्हावे लागले. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. या माहितीला तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दुजोरा दिला आहे. 

पती सैन्यात आहे. ती कोरोनामुळे घाबरून गेली होती. त्यामुळे तिने नवी मुंबईहून तीन महिन्याच्या बाळासह गावी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांची परवानगी घेऊन आपल्या सांगेली गावात आली. पती सैनिक असल्याने तिला सांगेली गावात सोडण्यासाठी पोलिस आले होते. कुटुंबीयांनी घरात घेतले नसल्याने तिला पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथून ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. पती नसल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भीती वाटू लागली म्हणून तिने आपले घर गाठले; पण घरातील मंडळींनी तिला प्रवेश देण्यास नाकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

संबंधित महिला सांगेली गावात घरी आली; पण तिच्या कुटुंबीयांनी तिला घरात घेतले नाही. तीन महिन्यांच्या बाळाला दूध तापवून देण्याचे देखील नाकारले. 
- राजाराम म्हात्रे, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Explained: पगार किती वाढणार? उशिरा लागू झाला तर थकबाकी किती मिळेल? पगारवाढीचं संपूर्ण गणित उघड

Dhurandhar : धुरंधरच्या शूटिंगसाठी रणवीर सिंग पाकिस्तानला गेलेला? स्वतः सांगितलं लोकेशन, कमी खर्चात तुम्हीही देऊ शकता भेट

फडणवीसांना ठाकरे बंधूंचे कडवे आव्हान; ठाण्यात शिंदेंची ‘ॲसिड टेस्ट’, पिंपरीत अजितदादांची अग्निपरीक्षा, मुंबई ते पुणे सत्तासंघर्षाचे गणित काय?

स्वत:च्या भावाचे ७ नगरसेवक फोडायला ठाकरेंनी किती खोके दिले? राज ठाकरेंचं नाव घेत भाजपचा राऊतांना सवाल

New Year Trip: नवीन वर्षात स्वस्तात फिरायचंय? मग मुंबईकरांनी 'ही' मस्त ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा

SCROLL FOR NEXT