Fish prices fell in Harne port 
कोकण

हर्णे बंदरात मासळीचे दर घसरले ; व्यापाऱ्यांबबत संताप

सकाळ वृत्तसेवा

हर्णे (रत्नागिरी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या काळात केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली असली तरी मिळणार्‍या मासळीला योग्य दर मिळत नसल्यामुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांमध्ये व्यापाऱ्यांबबत पूर्णपणे संताप व्यक्त केला जात आहे. 


दरम्यान, १ ऑगस्टपासून चालू झालेल्या हंगामानंतर क्यार वादळासारखी वादळे येऊन गेली. त्यातही मच्छीमार या वादळांना तोंड देत उद्योगासाठी उभा राहिला होता. पण दिवसेंदिवस मासळीचा दुष्काळ वाढत चालला असल्याच चित्र या हंगामात दिसून येत होतं. कारण मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांकडून मासळीची आवकच कमी येऊ लागली आहे. याला कारण म्हणजे एल.ई.डीच्या सहाय्याने होणारी मासेमारी व गुजरात, केरळ मल्फीमधून येणाऱ्या फास्टर नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे या पारंपरिक मच्छीमारांना मासळीच मिळेनाशी झाली आहे. या लढ्याला अनेकप्रकारे मच्छीमारांनी तोंड देऊन सुद्धा काहीही फरक पडला नाही.

एल.ई.डी द्वारे राजरोसपणे आजच्या घडीला देखील मासेमारी चालू आहे. शासन यावर काहीच ठोस निर्णय घेताना दिसत नाही हे आता मच्छीमाराना ज्ञात झाले असल्यामुळे मच्छीमार एल.ई.डी मासेमारीपुढे हतबल झाला आहे. अगदी बऱ्याचश्या नौका मालकांनी आपल्या नौका किनाऱ्यावरदेखील घेतल्या. हे नुकसान सावरत नाही तोवर कोरोनाच संकट येऊन ठेपल आहे. म्हणजे ' आगीतून फोफाट्यात गेल्यासारखी' येथील मच्छीमारांची अवस्था झाली आहे. अजून एल.ई.डीच संकट जातही नाही आणि जाणारही नाही. तोवर या कोरोना व्हायरसमूळे मासेमारी उदयोग बंदच ठेवावा लागला होता. परंतु जून व जुलै महिन्यात मासेमारी उद्योग बंद कालावधीचा विचार करून केंद्रशासनाने लॉकडाऊन मधून मासेमारीला नियम व अटी शर्तींवर परवानगी दिली. याचा मोठा दिलासा मच्छीमारानां मिळाला.

परंतु बहुतांशी मच्छिमार बांधवांनी फ्रब्रुवारीमध्येच मासळी आवक कमी असल्याने नुकसान होण्यापेक्षा बंद ठेवण्यात फायदा या धर्तीवर नौका किनाऱ्यावर काढल्या. तर काहींनी कोरोनाच्या धास्तीमुळे नौका परत मासेमारीकरिता नेल्याच नाहीत. काही ठराविक मच्छीमारांनी केंद्रशासनाच्या परवानगीमूळे आपला उद्योग सुरू केला. मासेमारी करायची कधी आणि खलाशयांचा खर्च, बँकेचे हप्ते, पावसाची बेगमीची तजवीज कशी करायची या विवंचनेत मच्छिमार पडला होता. मात्र शासनाने मासेमारीला नियम अटींसह सूट दिल्याने मच्छीमारामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

हेही वाचा-दिलासादायक : इचलकरंजीतील 'तो' चार वर्षांचा बालक झाला कोरोना मुक्त.... -
  दरम्यान, कोरोनामुळे बंदरामध्ये लिलाव बंदी , सर्व हॉटेल्सना बंदी, या हंगामात पर्यटकांची आवकच थांबली त्यामुळे येथील मासळी फक्त मच्छिसेंटरलाच द्यावी लागत असून याचा परिणाम मच्छीचे दर घसरण्यावर झाला आहे. त्यातच उधारीवर व्यवहार होत असल्यामुळे मासेमारीसाठी तयार झालेल्या नौका मालकांचा उत्साह मावळला आहे. लॉक डाऊनमध्ये भाजी, फळे, अन्नधान्य यांचे दर वाढले आहेत. मात्र हर्णै बंदरात मच्छीचे दर ३० ते ४० टक्क्यांनी उतरल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मासेमारीसाठी उत्साहाने तयार झालेल्या मच्छिमारांनी नौका बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. साहजिकच येथील मच्छिमार खलाशी पगार, बँकांचे हप्ते आदी प्रश्नांनी अधिकच चिंतेत पडला आहे. 

"चालू लाॅकडाऊन मध्ये सुदैवाने आम्हाला केंद्रशासनाकडून परवानगी मिळाली. आम्ही नियम अटींमध्ये हा उद्योग सुरूही केला. नशिबाने मासळी चांगल्याप्रकारे मिळत आहे. आताच्या परिस्थितीत सगळं बंद असल्यामुळे आणलेली मासळी बंदरातील मासळी सेंटरवरच विक्री करावी लागत आहे. परंतु येथील सेंटरधारक आमच्या मासळीचा योग्य तो दर देतच नाहीत.

लॉकडऊनच्या आधी पापलेटला किलोला ८०० ते १००० रुपयापर्यंत मिळणार दर आता मात्र ४०० ते ४५०, कोळंबी(टायनी) पूर्वी १५० रु. तर आता ८० रु., कोळंबी(चालू) पूर्वी २५० रू. तर आत्ता १६० रु. अश्या भावाने हे सेंटर धारक आमच्याकडून खरेदी करत आहेत. यामध्ये हे व्यापारी आम्हा मच्छीमारांचे कंबरडेच मोडत आहेत. सर्व स्तरावरील गोष्टींचे, वस्तूंचे दरामध्ये वाढ होत असताना मासळीचे दर मात्र घटत चालले आहेत. याने आधीच मेलेल्या मच्छीमाराला आणखीन मारले जात आहे. याकडे मस्त्यखाते व शासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे" ; असे हर्णे बंदर कमिटीचे कार्याध्यक्ष - श्री. बाळकृष्ण पावसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT