deepak kesarkar political news
deepak kesarkar political news 
कोकण

'MLA केसरकर 3 पक्षाचे झाले नाहीत, शिंदे गटाचे तरी काय होणार?'

सकाळ वृत्तसेवा

'जे आमदार आसाम गुवाहाटीला गेलेत, त्यातील बरेच आमदार पुन्हा येणार आहेत'

सावंतवाडी - महाविकास आघाडीतून जे आमदार फुटून गेले आहेत त्यातील अनेक आमदार हे पुन्हा परतीच्या मार्गावर असून या वर्षीची विठ्ठलाची महापूजा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करतील, असा मला ठाम विश्वास आहे. केसरकर तीन पक्षाचे झाले नाहीत ते शिंदे गटाचे तरी काय होणार? असा सवाल माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (deepak kesarkar political news)

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे-परब, रेवती राणे, पुंडलिक दळवी, काशीनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर, चित्रा देसाई आदी उपस्थित होते. भोसले म्हणाले, आमदार केसरकर यांनी राष्ट्रवादीवर कितीही टिका केली तरी कागद बदलू शकणार नाही. (maharashtra politics) त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात किती निधी दिला हे सर्वानाच माहित आहे. अनेक प्रकल्प मार्गी लागले असतानाही आपली छबी चमकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर टिका करत आहेत.

केसरकर यांनी आतापर्यंत अनेकांचा विश्वासघात केला हे सर्वानाच ज्ञात आहे, असे असताना त्यांची आमच्या नेत्यांवरही करत असलेली टिकाही स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात वैगरे काही नाही. जे आमदार आसाम गुवाहाटीला गेले आहेत. त्यातील बरेच आमदार पुन्हा येणार आहेत. येत्या काळात ते कळेल; पण यावर्षीची विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करतील."

आमदार नाईकांकडून 'मातोश्री'ची फसवणूक

मालवण - बंडखोर उदय सामंत, दीपक केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे 'मातोश्री'ची फसवणूक असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. सर्व आमदार गेले तरी मी शिवसेनेतच राहणार असल्याचे सांगत आहेत आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना स्वतः फटाके, झेंडे, बॅनर देऊन स्वतःचा सत्कार घडवून आणत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की, अन्य जिल्ह्यांमध्ये सेनेत गद्दारी केलेल्यांचा निषेध, शाई फेक, जोडे मारो, पुतळे जाळणे अशी आंदोलने होत असताना आमदार नाईक जिल्ह्यातील बंडखोरांबाबत चकार शब्दही काढत नाहीत किंवा साधा निषेधही करत नाहीत. शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांच्याबाबत बोलत नाहीत. फक्त आपला सत्कार घडवून आणतात, याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. बंडखोरांना व त्यांच्यासोबत असलेल्यांना शिवसैनिक घरी पाठविल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत, जे शिवसेनेशी गद्दारी करीत आहे, त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माफ करणार नाहीत, अशी संतप्त भावना इतर जिल्ह्यांमध्ये आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एक आमदार शिंदे गटात सामील झाला असताना आमदार नाईक मात्र आपण निष्ठावंत असल्याचेच ढोल बडवत आहेत.

नारायण राणे भाजपात नसते, तर आमदार नाईक सर्वप्रथम एकनाथ शिंदे गटात सामील झाले असते, अशी चर्चा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कुडाळ-मालवणच्या मतदारांमध्ये आहे. त्यामुळे शिंदे यांच्या सोबत असलेल्या संबंधांना धक्का न लावता सत्कार आणि निष्ठेचे नाटक करून आमदार नाईक 'मातोश्री'ची फसवणूक करत असल्याचे श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना, कोठे करायचा अर्ज; राज्यात सोलापुरातून पहिली शिफारस

Sakal Podcast: पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात

सावधान, बंद घरांवर चोरट्यांचा डोळा! 73 दिवसांत सोलापूर शहरात चोरी, घरफोडीचे 500हून अधिक गुन्हे; नागरिकांनी घ्यावी ‘ही’ खबरदारी

SCROLL FOR NEXT