Khed Shiv Sena leader Sachin Dhadve esakal
कोकण

Konkan Politics : ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; शिवसेना नेत्याचं माजी आमदाराला ओपन चॅलेंज

माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सुकीवली गावातून आघाडी घेऊन दाखवावी.

सकाळ डिजिटल टीम

येत्या विधानसभा निवडणुकीत जनता आमदार योगेश कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

खेड : माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सुकीवली गावातून आघाडी घेऊन दाखवावी. मी राजकीय संन्यास घेईन, असे प्रतिआव्हान शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे (Sachin Dhandave) यांनी दिले. खेड शिवसेना (Shiv Sena) संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

सुकीवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दिव्या होळकर विजयी झाल्यानंतर माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना तालुकाप्रमुख धाडवे यांच्यावर टीका केली. त्या टीकेला धाडवे यांनी उत्तर दिले असून, माजी आमदार कदम यांना प्रतिआव्हान दिले आहे.

धाडवे म्हणाले, माजी आमदार कदम यांच्या म्हणण्यानुसार वास्तविक दापोलीतील चारही ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मंडणगडमधील दोनपैकी एका ठिकाणी शिवसेनेचा तर दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार समर्थक यांचे वर्चस्व आहे. खेडमधील सुकीवलीत जरी आमच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी ज्या प्रभागात ही निवडणूक होती तेथे आमच्या शिवसैनिकांनी उत्तम काम केले आहे.

गतनिवडणुकीत येथे आम्हाला ५० सुद्धा मते मिळत नव्हती. तिथे आम्ही या निवडणुकीत २२२ मते मिळवली आहेत. आमचा उमेदवार आर्थिकदृष्टीने गरीब असला तरी त्याने चार पक्षासोबत कडवी झुंज दिली. हे चार पक्ष एकत्र येऊन लढले आणि विजयी झाले. यात माजी आमदार संजय कदम जरी आनंद साजरा करत असले तरी त्यांनी हे विसरू नये की, चार महिन्यांपूर्वी सुकीवली सरपंचपदाच्या निवडणुकीत सुकीवलीमधील मतदारांनी त्यांना त्यांची पात्रता दाखवली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत जनता आमदार योगेश कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. माजी आमदार संजय कदम यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सुकीवली गावातून आघाडी घेऊन दाखवावी. मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान धाडवे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

Datta Temple : मंदिरातून दत्त मूर्ती चोरीला, सायरन वाजला अन्; लोडेड पिस्तूल चोरट्यांनी..., थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT