Anil Parab, Ramdas Kadam Esakal
कोकण

परब-कदम संघर्ष; योगेश कदमांचा पत्ता कट करण्यासाठी तिघांनी आखला बेत

दापोली मतदारसंघात संघर्ष; रामदास कदमांचे विरोधक एकत्र

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी, माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्याशी वैर घेतल्यानंतर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या युक्तीप्रमाणे दापोलीचे (Dapoli) माजी आमदार सूर्यकांत दळवी, (Suryakant Dalvi) संजय कदम (Sanjay Kadam) आणि पालकमंत्री अनिल परब एकत्र आले आहेत. आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांचे २०२४ च्या निवडणुकीत तिकीट कापण्याचा बेत या तिघांनी आखल्याचा संशय कदम पिता-पुत्रांना आहे.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर परब यांनी कदम यांच्या विरोधातील भूमिका तीव्र केली. संघटनेत त्यांचे महत्त्व कमी करण्याबरोबरच कदम समर्थकांचेही खच्चीकरण करण्यास सुरवात केली. कदम यांना विधानपरिषदेचे तिकीट पुन्हा मिळणार नसल्याचे नक्की झाले. दापोली नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सूर्यकांत दळवी हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत निघाले होते. त्यांचा प्रवेशही निश्चित झाला होता; मात्र परब यांनी दळवी यांची समजूत काढली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या संभाव्य घडामोडीची माहिती दळवींना देत, त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश थांबवला.

संघटनेत राहणार नाहीत, यासाठी रणनीती..

दरम्यान, नगरपंचायत निवडणुकीत कदम पिता-पुत्रांना डावलून दळवी यांच्याकडे सूत्रे दिली. परब यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेत, कदम यांचे उत्तर रत्नागिरी संघटनेतील पंख पुरते छाटून टाकले. त्यांच्या मतदार संघातील शिवसेना (Shivsena)संघटनेत बदल करत, कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवला. पालिका निवडणूक प्रचारात कदम यांची गद्दार म्हणून हेटाळणी झाली. या साऱ्या अपमानानंतर कदम यांनी परब यांचे नाव घेत, जाहीर हल्लाबोल केला. परब यांनी थेट उत्तर दिले नसले तरी कदम हे संघटनेत राहणार नाहीत, यासाठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.

अप्रत्यक्षरित्या ठाकरेही लक्ष्य

कदम यांनी परब यांच्यावर जोरदार आरोप करत अप्रत्यक्षरित्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही लक्ष्य केले. उद्धव ठाकरे हे सध्यातरी परब यांच्या बाजूने झुकल्याचे दिसते. त्यामुळे या वादाची परिणिती कदम यांच्यासाठी नकारात्मक असेल, असा अंदाज आहे.

पालकमंत्री परब हे उत्तर रत्नागिरी भागातील संघटना संपवायला निघाले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी संजय कदम यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत माझी कैफियत मांडली आहे.

- रामदास कदम, शिवसेना नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT