konkan railway route Dirt on tracks 
कोकण

कोकण रेल्वे मार्गावर रुळावर माती, वाहतूक विस्कळीत

गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे.

सिद्धेश परशेट्ये, राजेश कळंबटे

गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे.

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर माती आल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रकावर परिणाम झाला. मांडवीसह मुंबईकडे जाणारी एक अशा दोन रेल्वे गाड्या दोन तास स्थानकातच थांबून होत्या. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा प्रकार दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला. (konkan railway route Dirt on tracks)

गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांसह उपनद्या, वहाळ भरुन वाहत आहेत. डोंगरातील झरे वेगाने प्रवाहीत झाले असून त्या पाण्याबरोबर मातीही वाहून येत आहे. त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. गुरुवारी (ता. 14) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान डोंगरातील माती रुळावर आली होती.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर तत्काळ कोकण रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोचून माती बाजूला करण्याचे काम सुरु केले. या प्रकारामुळे गाड्या धिम्या गतीने धावत आहे. चिपळूण ते खेड दरम्यान वाहतूक थांबविण्यात आली होती. मुंबईहून मडगावकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. तर चिपळूण स्थानकात मुंबईकडे जाणारी एक एक्स्प्रेस थांबविण्यात आली होती. माती काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याचे कोकण रेेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या तीन वर्षात कोकण रेल्वे मार्गावर माती येण्याच्या प्रकाराना आळा बसला होता. यंदा बर्‍याच कालावधीनंतर पहिल्याच टप्प्यातील पावसात माती खाली येण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकारामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. खेड स्थानकावर कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुचना दिल्या जात होत्या. परंतु गाडी कधी धावणार हे सांगितले जात नसल्याने प्रवाशांच्या नाराजीत भर पडली होती.

दरम्यान, अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आल्यामुळे आजची (दि. १४.०७.२०२२) १०१०३ मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली आहे. इतरही गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन काढून मदतकार्यासाठी नेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT