Red Alert in Sindhudurg esakal
कोकण

Konkan Rain : सिंधुदुर्गात वादळी वाऱ्‍यामुळं मोठी हानी; जिल्ह्यात Red Alert, पावसासोबत वाऱ्‍याचा वेग वाढण्याची शक्यता!

दोन दिवस जिल्ह्याच्या किनारपट्टीसह उर्वरित भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण पूर्णत: बदलून गेले आहे.

वैभववाडी : कोकण किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आजदेखील संपूर्ण जिल्ह्यात जाणवला. बहुतांशी भागात सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस (Sindhudurg Rain) झाला. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत वादळी वाऱ्‍यामुळे मोठी हानी झाली.

कमी दाबाचा पट्टा आज रात्री कोकण किनारा (Konkan Rain) ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने (Meteorological Department) सिंधुदुर्गात आज (ता. १) रेड अलर्ट जाहीर केला असून, जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

दक्षिण कोकण, गोवा किनाऱ्‍यालगत पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस जिल्ह्याच्या किनारपट्टीसह उर्वरित भागात जोरदार पाऊस सुरू आहे. वाऱ्‍याचा वेग वाढल्याचे चित्र आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज पहाटेपासून जिल्ह्यात जाणवत आहे. काही भागात मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहत होता. जिल्ह्याच्या अन्य भागात देखील वाऱ्‍याचा वेग वाढला आहे. पावसाच्या सरींवर सरी कोसळत असून, जिल्ह्यातील वातावरण बदलून गेले आहे. पावसाने जिल्ह्यात नुकसानसत्र वाढले आहे. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात तीव्रता जास्त आहे. बांदा परिसरात वादळी वाऱ्याच्या तडाख्याने ठिकठिकाणी झाडे पडून मोठी हानी झाली.

विशेषतः महावितरणाच्या नुकसानाची तीव्रता अधिक आहे. सावंतवाडी शहरालाही पावसाने मोठा तडाखा दिला. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा प्रतितास २० किलोमीटर वेगाने ईशान्येकडे सरकत आहे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र रत्नागिरीच्या दक्षिणे-नैऋत्येस सुमारे ७० किलोमीटरवर, पणजीच्या वायव्येस १२० किलोमीटरवर आणि कर्नाटक येथील होनावरच्या वायव्येस २८० किलोमीटरवर पसरले आहे.

कमी दाबावा पट्टा आज रात्री कोकण किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रात्री आणि उद्या दिवसभर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत पावसासोबत वाऱ्‍याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

परिपक्व भातावर परिणाम शक्य, उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण

हवामान विभागाने जिल्ह्यात आज (रविवार) रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचा परिपक्व झालेल्या भातपिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तौक्ते वादळाप्रमाणे जिल्ह्यात वातावरण

पूर्वमध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण पूर्णत: बदलून गेले आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात तौक्ते वादळाप्रमाणे वातावरण दिसून येत आहे. तौक्ते वादळावेळी देखील दिवसभर मुसळधार पाऊस आणि पावसाळी वातावरण तयार झाले होते. सध्या तितका पाऊस पडत नसला तरी, वातावरण त्याचप्रमाणे दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT