Mandangad Municipal Panchayat taking masks at the door of citizens kokan marathi news 
कोकण

मंडणगडात नगरपंचायत मास्क घेवून नागरीकांच्या दारी...

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) :कोराना विषाणू संसर्गाचे पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या विविध उपाययोजनात आघाडी घेणाऱ्या मंडणगड नगरपंचायतीने शहरातील प्रत्येक नागरीकांस कापडी मास्क पुरवण्याची योजना तयारी केली असून या योजनेचा शुभारंभ ता.27 मार्च रोजी नगराध्यक्षा आरती तलार, मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या उपस्थितीत कोंझर येथे करण्यात आला.

शहर परिसरातील बाजारपेठेत सुरु असलेल्या जीवनावश्यक सेवांचे दुकानदार व पोलीस कर्मचारयांनाही मास्कचे वाटप करण्यात आले. विषाणू संसर्गाचे कालावधीत बाजारात मास्कचा तुटवडा आहे. याशिवाय बाजारातील मास्क एकदा वापरल्यावर परत वापरता येत नाहीत या समस्येवर मात करण्यासाठी शहरातील महिला बचत गट व शिवण काम करणारे  व्यवसाईकांना संपर्क करुन कापडी व धुवून वापरता येतील असे मास्क तयार करण्यात येत आहेत. ते मास्क नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना नगरपंचायत पोहच करीत आहे. शहारातील प्रत्येक नागरीकांस मास्क देणे हे नगरपंचायतेचे कर्तव्य असून लवकर नगरपंचायत नागरिकांच्या घरापर्यंत मास्क घेऊन दारी येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी या निमीत्ताने स्पष्ट केले आहे.

प्रभागांनंतर तहसिल, पोलिस ठाणे परिसर निर्जंतुकीकरण
 मंडणगड नगरपंचायत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. कार्यक्षेत्रातील सर्व प्रभाग, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानक व तहसिल कार्यालय, पोलिस ठाणे परिसरात फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच दरदिवशी शहरात बदलत्या वातावरण आणि नगरपंचायतीने केलेल्या उपाययोजना नागरीकांपर्यंत पोचवण्यासाठी गाडी फिरवून उद्घोषणाद्वारे माहिती दिली जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आईसोबत वादानंतर घरातून बाहेर पडली, रस्त्यावर लिफ्टच्या बहाण्यानं सामूहिक अत्याचार; मारहाण करत धावत्या कारमधून रस्त्यावर फेकलं

Bhiwandi Politics: भिवंडीत तिकीट वाटपावरून बंडखोरी; सपा नेतृत्वाच्या अडचणी वाढल्या! अंतर्गत फुट उघड, नेमकं समीकरण काय?

Vi Recharge : आज करा रिचार्ज, मग डायरेक्ट 12 महिन्यानंतर..फ्री मिळेल 50GB जास्त डेटा; पूर्ण वर्ष कॉलिंग, काय आहे ही स्पेशल ऑफर?

Vijay Hazare Trophy: पडिक्कलची चार सामन्यात तिसरी सेंच्युरी; सर्फराज खान-ऋतुराज गायकवाडचीही वादळी शतके; टीम इंडियात कोणाला संधी?

Pimpalwandi Leopard News : पिंपळवंडीत बिबट्याचा थरार संपला! थर्मल ड्रोनच्या निगराणीनंतर अखेर 'सहा वर्षांचा' बिबट्या पिंजऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT