marleshwar svabhu dev and girija devi wedding ceremony 
कोकण

थाटामाटात लागले `या` देवांचे लग्न

सकाळ वृत्तसेवा

साडवली  - गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा ... या मंजुळ स्वराबरोबरच ढोल- ताशे, सनई चौघडे, फटाक्‍यांची आतषबाजी, हर हर मार्लेश्वर', शिव हरा शिव हरा' च्या गजराने सह्याद्रीच्या रांगा दुमदुमल्या. सहयाद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) पार पडला. हिंदू लिंगायत पध्दतीने दुपारी 1 वाजून 05 मिनिटांच्या शुभमुहुर्तावर मानकरी व राज्यातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह झाला. 

या विवाह सोहळ्याला गोठणे गावची करवली नटून थटून आली होती. साखरपा येथील वधू गिरीजा देवीची पालखी, मार्लेश्वराची पालखी व सोहळ्याचे यजमान देवरूख येथील वाडेश्वर, मानकरी, पालख्या ,दिडींचे व वजहाड मंडळींचे मंगळवारी रात्रौ मार्लेश्वर पवई येथे आगमन झाले होते. त्यांचे बुधवारी सकाळी विवाहस्थळी स्वागत करून 360 मानकऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण विधीचा प्रारंभ केला. श्री मार्लेश्वर देवाला हळद चढवून कल्याणविधी सोहळ्याला सुरूवात झाली. 

यावेळी रायपाटण, लांजेकर स्वामी, म्हसोळी महाराज, धारेश्वर या स्वामींना मार्लेश्वर मंदिराजवळ आणून पाद्य पूजा व त्यांना आसनस्थ करून त्रिपूर उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. कल्याण विधीत मार्लेश्वराची म्हणजेच नवरदेवाची मूर्ती (चांदीचे टोप) आंगवलीचे अणेराव यांनी मांडीवर घेतली होती. गिरीजामाईची मूर्ती लांजेकर स्वामी मांडीवर घेवून बसले होते. पौरोहित्य धारेश्वर स्वामी व पाटगांवचे जंगम यांनी केले. 


..म्हणून सोहळा यादगार 
विवाह सोहळा मार्लेश्वर देवतेच्या गुहेसमोरील सभा मंडपात पार पडला. हा विधी पार पडत असताना गुहेतील देवतेला याचे दर्शन घडणे आवश्‍यक असते. गंगा सिंधूही मंगलाष्टके वऱ्हाडी मंडळींनी सामुहिकपणे म्हणून सोहळा यादगार केला. रात्रौ साक्षी विडे भरून या सोहळ्याची सांगता झाली. 

श्री देव सोमेश्वर व गिरीजा देवीचा विवाह 
मार्लेश्वर- गिरीजा देवी विवाहसोहळ्याप्रमाणे संगमेश्वर तालुक्‍यातील मठधामापूर येथील श्री देव सोमेश्वर व गिरीजा देवीचा विवाह सोहळा मकरसंक्रातदिनी लिंगायत- गुरव धर्मिय शास्त्रानुसार मानकरी, भाविकांच्या साक्षीने थाटात संपन्न झाला. याठीकाणीही भाविकांचा जनसागर लोटला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

RCB vs GT Qualifier 1 : कागिसो रबाडाने इतिहास घडवला! मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, शुभमन गिलच्या अफलातून झेलची हवा... Video

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेच्या 'या' मागण्या सरकार का स्वीकारत नाही? OPS बाबत महत्त्वाची माहिती...

School Notebook Price Hike : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना झटका! वह्या, पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ; जून महिना उजाडण्यापूर्वीच बजेट कोलमडणार

सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT