कोकण

'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी' अंतर्गत सव्वालाख लोकांची तपासणी

1 हजार 133 पथकांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली

राजेश कटंबटे

रत्नागिरी : 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी' (mazi ratnagiri, mazi jababdari) मोहीमेंतर्गत जिल्ह्यात (ratnagiri) गृह भेटीमधून नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु आहे. आतापर्यंत 1 लाख 24 हजार 71 जणांची तपासणी पूर्ण झाली असून 85 जण कोरोना बाधित (covid-19 patients) आढळले. त्यातील 24 जणांना केअर सेंटरमध्ये (covid center)दाखल करण्यात आले आहे. तर 329 ताप, सर्दी, खोकला असलेले रुग्ण आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाडी-वस्तीवर आढळत असून गावे क्वारंटाईन (quarantine) करण्याची वेळ आली आहे. अनेकजण वेळेत उपचारासाठी येत नसल्यामुळे मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. कोरोना (covid-19 control) परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी' मोहीम हाती घेतली आहे. सोमवारपासून (3) गावागावांत गृह तपासणी सुरु झाली. यासाठी जिल्ह्यात स्थापन केलेल्या 1 हजार 133 पथकांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

35 हजार 338 घरांना भेटी देण्यात आल्या असून 43 हजार 902 कुटुंबातील 1 लाख 24 हजार 71 व्यक्तींची तपासणी केली. यामध्ये नागरिकांची प्राणवायू (oxygen level) पातळी, शरीराचे तापमान आणि काहींची सहा मिनिटांची वॉक टेस्ट (walk test) घेण्यात आली. यामध्ये चाललल्यानंतर तपासणीत 95 पेक्षा खाली आलेल्यांची संख्या शंभर आहे. ताप, सर्दी, खोकला असणार्‍या व्यक्तींची संख्या 329 इतकी आहे. त्यातील 221 जणं शासकीय रुग्णालयात तर 60 जणं खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. या तपासणीत कोरोना बाधित आलेल्यांपैकी 61 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पथकाकडून कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी याचा प्रचारही केला जात आहे. पथकांच्या भेटीवेळी 4 हजार 889 घरे बंद होती.

पथकांकडून तपासणी केलेल्याची आकडेवारी

  • तालुका तपासलेले पॉझीटीव्ह बंद घरे

  • मंडणगड 7,267 0 442

  • दापोली 9,133 0 541

  • खेड 5,021 1 302

  • गुहागर 17,351 4 697

  • चिपळूण 19,327 18 515

  • संगमेश्‍वर 10,563 1 465

  • रत्नागिरी 11,354 1 331

  • लांजा 2,643 3 73

  • राजापूर 15,704 1 741

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT