nitesh rane esakal
कोकण

नितेश राणेंच्या नियमित जामिन अर्जावर सोमवारी होणार फैसला

नितेश राणे यांना अटक होणार की नाही ? याबाबत सोमवारी स्पष्ट होणार आहे.

-विनोद दळवी

नितेश राणे यांना अटक होणार की नाही ? याबाबत सोमवारी स्पष्ट होणार आहे.

ओरोस - आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायालयात आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात आली. शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा (Sindhudurg District) न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवारी ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होणार की नाही ? याबाबत सोमवारी स्पष्ट होणार आहे.

आमदार नितेश राणे यांनी आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालयात दाखल झाले होत. त्यांच्या समवेत माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप (BJP) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी कधी होईल ? आज झाली तर जामीन मिळेल का ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र आता न्यायालयाने त्यांना सोमवार पुन्हा एकदा हजर होण्यास सांगितलं आहे. (Supreme Court)

कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आ राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अबरार अहमदला करारबद्ध करणाऱ्या काव्या मारनच्या SRH ला सुनील गावस्करांनी सुनावले; म्हणाले, या पैशातून ते आपले जवान मारतात...

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

चिंता वाढली! वॉकिंग स्टिकचा आधार घेत BCCI पुरस्कारांसाठी पोहचला टीम इंडियाचा खेळाडू; VIDEO

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

Latest Marathi Update : गोरेगावात चुलीवर शिजतेय गरीबांची शिव भोजन थाळी

SCROLL FOR NEXT