Only 17 teachers for five and a half students
Only 17 teachers for five and a half students 
कोकण

शिक्षणाचा बाजार ; साडेपाचशे विद्यार्थ्यांसाठी केवळ 17 शिक्षक 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - तालुक्‍यातील कान्हे पिंपळी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट दिली. यामध्ये येथे शिक्षण घेत असलेल्या साडेपाचशे विद्यार्थ्यांसाठी अवघे 17 शिक्षक कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कायमस्वरूपी प्राचार्य नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पालकांनी मांडल्या आहेत. 

कान्हे येथे असलेल्या शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण ठरली आहे. असंख्य विद्यार्थी आज या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र गेल्या काही वर्षापासून या संस्थेत शिक्षक संख्या कमी असण्याबरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्याने त्याचा फटका तेथील विद्यार्थ्यांना बसत आहे. काही पालकांच्या आयटीआयमध्ये असणाऱ्या गैरसोयीबद्दल तक्रारी आल्यानंतर माजी सभापती मुकादम यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या वेळी प्रभारी प्राचार्य शेट्ये यांच्याशी तेथील गैरसोयींबद्दल चर्चा केली. 

या चर्चेत संस्थेत प्राचार्यांची नेमणूक केली गेली नसल्याने सध्यस्थितीत तेथील पदभार हा गुहागरचे प्राचार्य शेट्ये यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शेट्ये हे आठवड्यातून एक दिवस कामकाज पाहण्यासाठी येथे भेट देतात. या आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमासाठी सुमारे साडेपाचशे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी सध्या 17 शिक्षक कार्यरत आहेत. तब्बल 34 मार्गदर्शक शिक्षकांची आवश्‍यकता असताना सध्या मानधन देऊन वर्गवारीनुसार काही शिक्षक नेमले असल्याचे निदर्शनास आले. वर्कशॉप नंबर 2 प्रशिक्षणार्थी वसतिगृहाची आवश्‍यकता असल्याचे पुढे आले. प्राचार्य व शिक्षकांच्या नेमणुका करण्यासंदर्भात मुकादम यांनी तत्काळ औद्योगिक प्रशिक्षण खात्याचे मंत्री नवाब मलीक यांच्याकडे मागणी केली जाईल. तसेच आयटीआयमध्ये ऍप्रेंटिस केलेल्या विद्यार्थ्यांना विस्तारित कंपन्या व रेल्वेत नोकऱ्या उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही मुकादम यांनी स्पष्ट केले. या वेळी एस. बी. शिंदे, माजी उपसभापती राजाभाऊ चाळके, आर. पी. आय. चे राजू जाधव, अक्षय केदारी, खालिद पटाईत, विकास जोगळेकर आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहायचाय? मग, महाराष्ट्राच्या 'या' माऊंट एव्हरेस्टला नक्की द्या भेट

T20 WC 24 Team India : T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT