problem faced by college students due to range problem in ratnagiri 
कोकण

'कोरोना कॉलेजला जाऊ देईना अन् बीएसएनएल घरात शिकू देईना'

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या, म्हणत देव्हारे येथील बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा उडाला असून सर्वसामान्य त्रस्त ग्रामस्थ, महिला आणि व्यावसायिक मंडळीमध्ये आता नव्याने विद्यार्थीवर्गाची भर पडली आहे. विद्यार्थी नेटच्या शोधात फिरत रानोमाळ भटकत आहेत.

लॉकडाउनमुळे कमीअधिक पण बऱ्याच शाळांमधून ऑनलाइन अध्यापन केले जातेय, गृहपाठ दिला जातोय. आतापर्यंत एखादी टाकलेली पोस्ट नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोड्याफार फरकाने पुढेमागे गेली तरी चालत होते पण आता दिवाळी सुट्ट्यांनंतर महाविद्यालयांतून ऑनलाइन अध्यापन सुरू झाले आहे. पाठोपाठ येथील विद्यार्थीवर्गाची परवडही. हातात मोबाईल घेऊन विद्यार्थी रानोमाळ नेटच्या शोधात फिरत आहेत.

तालुक्‍यातील कॉलेजचे ऑनलाइन अध्यापन आता नियमित सुरू झाले असले तरी काही तालुक्‍याबाहेरील कॉलेजचे ऑनलाइन अध्यापनसत्र सुरू आहे. त्यांच्या चाचणी परीक्षासुद्धा पार पडल्यात. कोरोना जाऊ देईना... बीएसएनएल शिकू देईना...
घरात रेंज, नेट नाही आणि असले तरी पुरेसा स्पीड नसल्यामुळे असून नसून सारखेच. त्यामुळे कोरोना कॉलेजला जाऊ देईना आणि बीएसएनएल घरात शिकू देईना, अशी येथील विद्यार्थांची अवस्था झाली आहे. नव्याने कॉलेजला प्रवेश घेतलेल्या ११ वीच्या विद्यार्थ्यांना हा जेवणात पहिल्याच घासाला खडा लागावा, असा अनुभव आहे.

"डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची प्रथम सत्र परीक्षा होऊ घातली आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या भीतीने आणि मुंबई-ठाण्यातल्या शैक्षणिक संस्थांबाबत शासकीय घोषणेमुळे काही कुटुंबे पुन्हा गावाकडे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. असे सर्वच विद्यार्थी यात भरडले जाणार आहेत. त्यामुळे समस्त पालकांत चिंतेचे वातावरण आहे. तरी त्वरित सेवा सुरळीत करावी."

- पुंडलिक शिंदे

"१० डिसेंबरपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा चालू होणार आहेत. त्यामुळे फोन व वायफाय नेटवर्क व्यवस्थित रहाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवाण्याच्यादृष्टीने २ डिसेंबरला मंगळवारी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहोत."

- जमीर माखजनकर, सामाजिक कार्यकर्ता

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे पुण्याच्या नदीपात्रात ठाण मांडून बसले

Latest Marathi News Live Update: सहकार कायद्यात काळानुरूप होणार ' बदल ' राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती जाहीर

T20 World Cup: टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघांची घोषणा; नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संपूर्ण टीम

Pune Election 2026 : कात्रजमध्ये निवडणुकीचा मोठा 'धडाका'! नाकाबंदीत तब्बल ६७ लाखांची रोकड जप्त

Pune Robbery : रुग्णाच्या नावाखाली सापळा; सहकारनगर हद्दीत डॉक्टरला लुटणारे सीसीटीव्हीत कैद!

SCROLL FOR NEXT