Required link for transport pass in ratnagiri kokan marathi news
Required link for transport pass in ratnagiri kokan marathi news 
कोकण

घर बैठे ट्रान्सपोर्ट पास हवा आहे मग या लिंकवर क्लिक करा.....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाच्या संक्रमणाच्या महत्वाच्या टप्प्यात आपण आलो असताना दुचाकी वाहने घेऊन अनावश्यक कारणासाठी बाहेर हिंडणाऱ्या लोकांची ही हौस आता बंद झाली असून रत्नागिरी जिल्ह्यात शहरी भागात दुचाकी वाहने आता चालवता येणार नाहीयेत. मात्र यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. यासाठी सेवा चालकांना प्रशासनाचा पास असणे आवश्यक आहे. परंतु तो पास मिळवण्यासाठी आता तहसीलदार कार्यालयात जावे लागणार नसून जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासन ही ऑनलाईन पास उपलब्ध करून देणार आहे.याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यातील महत्वाचे मुद्दे आणि पाससाठी आवश्यक लिंक खालील प्रमाणे….

पास मिळवायला होणारी गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस देणार ऑनलाइन सेवा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी दिली महत्वाची माहिती कोरोना संक्रमणाची भीती असताना अत्यावश्यक सेवांसाठी जिल्हा प्रशासनाकडून पास देण्यात येत होता.या पासद्वारे मालाची वाहने, मेडिकल सेवेतील व्यक्तीसह अनेकजणांना बंदीच्या काळातही प्रवास करता येत होता. मात्र हा पास काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयांवर गर्दी होऊ लागली. आणि यामुळे धोकाही वाढला.

खालील लिंकवर क्लिक करा 

 या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस दालने एकत्र येऊन ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
याची माहिती देताना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे म्हणाले की सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवांसाठी लागणारा पास आता घरबसल्या काढता येणार आहे.यासाठी covid19.mhpolice.in या लिंकवर क्लिक करा आणि त्याद्वारे आवश्यक माहिती भरून दिल्यानंतर QR code उपलब्ध करून दिला जाणार आहे.हा code दाखवल्यानंतर वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.यामध्ये एकाही कागदाची, प्रत्यक्ष येऊन भेटण्याची गरज लागणार नाही, केवळ हा पास अत्यावश्यक सेवेसाठी लागू होईल हेही डॉ मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

13 कैदी पॅरोलवर सोडले जाणार

याचवेळी शनिवारी मध्यरात्रीपासून शहरी भागात दुचाकीला बंदी घालण्यात आली असल्याचे डॉ मुंढे यांनी स्पष्ट केले.तर भाजी विक्रेत्यांना रत्नागिरी शहरात ठिकाणी वेगवेगळे बसविण्यात येणार असून त्यामुळे लोकांना त्यांच्या घराजवळच भाजी उपलब्ध होणार आहे.त्याशिवाय किराणा मालासाठी घरपोच सेवा सुरू करण्यात आली असून लोकांची बाहेर पडण्याची कारणे कमी होणार आहेत हे स्पष्ट केले.राज्याच्या तुरुंगातून 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा भोगणार्या कैद्यांना पॅरोलवर सोडणार आहेत त्यात रत्नागिरी जेल मधून सुमारे 13 कैदी पॅरोलवर सोडले जातील असेही त्यांनी सांगितले.या कोरोनाचा सामना करण्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आपण आलो असून लोकांनी घरीच राहावे असे आवाहन डॉ मुंढे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT