कोकण

दुसरी लाट महिन्यात आटोक्यात आणणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून हॉटस्पॉटवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : कोरोनाची (covid -19) दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे. त्यासाठी वॉर रुम तयार करून समन्वय अजून चांगला केला जाईल. उद्यापासून दिवसाला १० हजार चाचण्या करण्यात येतील. त्याचा अहवाल बारा तासांत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. तसा करार खासगी हॉस्पिटलशी केला जाणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून हॉटस्पॉटवर (hotspot) विशेष लक्ष दिले जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट महिन्यात आटोक्यात आणू, अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (ratnagiri district)

पाटील म्हणाले, जिल्ह्यातील बाधितांचा रेट ५ टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे. आरटीपीसीआर (RT-PCR) ६० व अॅन्टिजेन ४० टक्के असा चाचण्यांचा रेशो असणार आहे. रत्नागिरी कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये हजार ते दीड हजारची क्षमता आहे. ती अडीच हजारांवर करण्याचा प्रयत्न आहे. चिपळूणसह (chiplun) जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांशी करार करून १२ तासांत त्याचे अहवाल मिळतील, या दृष्टीने प्रयत्न आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून हाय रिस्क आणि लो रिस्क अशी कॅटॅगिरी केली जाणार आहे. ‘माझे गाव कोरोनामुक्त’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी हॉटस्पॉटवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

जिल्ह्यात पर्यटन आणि सणासुदीला येणाऱ्यांची चाचणी करण्याचा विचार आहे. गावे कोरोनामुक्त करून त्यांना शासनाकडून ५० लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, कोस्टल आणि नॉन कोस्टल झोन, घाट आदी विकसित करून पर्यटकांना आकर्षित करून ते थांबतील. या अनुषंगाने पर्यटन आराखडा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते.

७ हजार कामगारांच्या चाचण्या

जिल्ह्यातील विविध एमआयडीसीतील सुमारे साडेआठ हजार कामगार असून त्यापैकी सात हजार कामगारांच्या चाचण्या झाल्या आहेत, तर सात हजार कामगारांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक

Latest Maharashtra News Updates Live: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

हळदीकुंकवात करंडे- फण्या देऊन कंटाळलात? डीमार्टमध्ये १५ रुपयापासून मिळतायत भन्नाट ऑप्शन; वाचा यादी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रकल्पांना भूसंपादनाचे ग्रहण; शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन चिंतेत

SCROLL FOR NEXT