MLA Nitesh Rane esakal
कोकण

Nitesh Rane : मोपा, चिपी विमानतळातील फरक राणेंना कळतो का? शिवसेना नेते सावंतांनी धरलं धारेवर

ठाकरे कुटुंब आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करणे हेच आता राणेंचे व्हीजन झाले.

सकाळ डिजिटल टीम

नीतेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील प्रश्‍नांकडे कधी ढुंकूनही पाहिलेले नाही.

कणकवली : आदित्‍य ठाकरे (Aditya Thackeray) हे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर (Chipi Airport) दाखल होणार आहेत. त्‍यामुळे चिपी आणि गोव्यातील मोपा विमानतळ (Mopa Airport) यातील फरक आमदार नीतेश राणेंना कळतो का?, अशी टीका शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली.

ठाकरे कुटुंब आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करणे हेच आता राणेंचे व्हीजन झाले असल्‍याचेही ते म्‍हणाले. येथील शिवसेना कार्यालयात सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, महेश कोदे, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

सावंत म्‍हणाले, नीतेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील प्रश्‍नांकडे कधी ढुंकूनही पाहिलेले नाही. इथल्‍या समस्यांना त्‍यांनी कधीही वाचा फोडलेली नाही. केवळ ठाकरे कुटुंबिय आणि संजय राऊत यांच्यावर सतत टीका करून प्रसिद्धी मिळविणे हेच आता त्‍यांचे व्हीजन झालेले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे खळा बैठकांच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. त्‍यांच्या दौऱ्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. कणकवली पटवर्धन चौकात आज (ता.२३) दुपारी त्‍यांचे भव्य स्वागत होईल. त्यानंतर तेकार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहेत, असे सतीश सावंत म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Latest Marathi News Live Update : चिंचवडमधील फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT