कोकण

कोकणात करेक्ट कार्यक्रम; शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत

चौघांचे पक्षात स्वागत केले व त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळ मिळाले असल्याचे सांगितले.

चंद्रशेखर जोशी

चौघांचे पक्षात स्वागत केले व त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळ मिळाले असल्याचे सांगितले.

दाभोळ : आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून, दोन महिन्यांत खेड येथे २ लाख लोकांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा घेणार असल्याची घोषणा संदीप राजपुरे यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर ते बोलत होते. पक्षप्रवेश कार्यक्रमाला आपले सुमारे २ हजार समर्थक उपस्थित असल्याचा दावा राजापुरे यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठल आणि युवासेना दापोली उपतालुका अधिकारी विकास जाधव यांनी आज शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी चौघांचे पक्षात स्वागत केले व त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळ मिळाले असल्याचे सांगितले.

कुणबी सेवा संघाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी सभागृह तुडुंब भरले होते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना उभे राहून हा कार्यक्रम पाहावा लागला. राजपुरे म्हणाले, ‘गेली तब्बल २५ वर्षे मी शिवसेनेचे काम केले. ९ वर्षे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम केले आहे; तर शंकर कांगणे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून सेनेचे काम करत आहेत. मुलुंड येथील कुणबी समाजोन्नती संघाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने निधी द्यावा, या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली व निधीची मागणी केल्यावर अर्थसंकल्पात ५ कोटींची; तसेच शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.’ यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधकांकडून संभ्रम निर्माण

शासन आदेशातील एका वाक्याचा वेगळा अर्थ काढून ५ कोटी रुपये शासन परत घेणार, अशा स्वरूपाची पत्रके वाटून विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्यात आला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक नवा रुपयाही शासन परत घेणार नाही, अशी ग्वाही दिली आहे, असे राजपुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT