prasad sawant latest news 
कोकण

मागच्या वेळी फक्त मारहाण केली होती, यावेळी जीवे मारू; शिवसेना नेत्याला फोनवरून धमकी

याच प्रसाद सावंत यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्लाही करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सत्तानाट्य रंगले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, बंडखोर आमदार आणि खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चांगलाच धुमसत आहे. शिवसैनिक आणि बंडखोर गटाचे समर्थक आमने-सामने येत असताना काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत आहेत. अशीच एक बातमी समोर आली आहे.

माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सावंत यांना रविवारी फोनवरून ही धमकी देण्यात आली. याच प्रसाद सावंत यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्लाही करण्यात आला होता. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिले होते. तसंच कर्जतचे बंडखोर शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा फोटोही त्यांनी माथेरानच्या शिवसेना शाखेतून काढला होता.

दुसऱ्याच दिवशी प्रसाद सावंत हे कर्जतला गेले असताना अज्ञातांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यातून ते थोडक्यात वाचले. या हल्ल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला असून हल्ल्यातील जवळपास ८ ते १० आरोपी हे अजूनही फरार आहेत. दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले प्रसाद सावंत हे सध्या माथेरानमधील घरी विश्रांती घेत आहेत.

काय घटना घडली?

रविवारी ३१ जुलै रोजी प्रसाद सावंत यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या इसमाने सावंत यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तुझी नेतेगिरी माथेरानमध्येच कर, कर्जतमध्ये आला तर मागच्या वेळी फक्त मारहाण करून सोडलं, पण यावेळी जीवे मारू, अशी थेट धमकी फोन करणाऱ्या इसमाने दिली. याप्रकरणी प्रसाद सावंत यांनी माथेरान पोलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT