Adil Rashid England Vs Pakistan T20 World Cup Final Babar Azam esakal
क्रीडा

Adil Rashid : एका 'पाकिस्तानी'नेच पाकिस्तानची लावली वाट, आवडत्या बाबरची केली शिकार

अनिरुद्ध संकपाळ

Adil Rashid England Vs Pakistan T20 World Cup Final : मेलबर्न येथे सुरू असलेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी 20 वर्ल्डकप 2022 फायनल सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावात रोखले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून फिरकीपटू आदिल राशिदने दमदार मारा करत पाकिस्तानचे दोन फलंदाज बाद केले. विशेष म्हणजे त्याने 4 षटकात फक्त 22 धावा देत ही कामगिरी केली. त्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबर आझमला 32 धावांवर बाद करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला.

विशेष म्हणजे आदिल राशिदचे मूळ पाकिस्तानातील मीरपूर येथे आहे. यॉर्कशायरनिवासी असलेल्या आदिल राशिदचे पूर्वज हे 1967 मध्ये मीरपूरवरून इंग्लंडला स्थलांतरित झाले होते. राशिद जरी इंग्लंडचा नागरिक असला तरी त्याचे पाकिस्तान प्रेम काही कमी झालेले नाही. त्याला अव्वल पाकिस्तानी फलंदाजाची शिकार करण्यास फार मजा येते. त्यामुळेच त्याने आदिल राशिदने बाबर आझमला यापूर्वी तीनवेळा बाद केले होते. दुसरीकडे बाबरला राशिद विरूद्ध 61 चेंडूंचा सामना करून फक्त 77 धावाच करता आल्या आहेत. बाबर आझम आदिलची गुगली ओळखू शकत नाही. आजही तो 28 चेंडूत 32 धावा करत राशिदच्या गुगलीवरच बाद झाला.

इंग्लंडने पाकिस्तानची 20 षटकात 8 बाद 137 धावा अशी अवस्था केली असली तरी पाकिस्तानने देखील इंग्लंडला पॉवर प्लेमध्ये धक्के दिले. शाहीन आफ्रिदीने अॅलेक्स हेल्सचा 1 धावेवर त्रिफळा उडवला तर चौथ्या षटकात हारिस रौऊफने फिलिप सॉल्टला 10 धावांवर बाद केले. दरम्यान, इंग्लंडचा डाव एकहाती सांभाळून आक्रमक सुरूवात करणाऱ्या जॉस बटरला हारिस रौऊफने 26 धावांवर बाद केले. बटरलने 17 चेंडूत 26 धावा करत इंग्लंडला पाच षटकात 43 धावांपर्यंत पोहचवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : जानेवारीच्या पगारात 8व्या वेतन आयोगाची वाढ मिळेल का? किती वाढणार पगार? जाणून घ्या पगारवाढीबाबत मोठा अपडेट

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Navneet Rana : मौलानाला चार बायका १९ मुलं, आता हिंदूंनीही ४ मुलं जन्माला घाला; भाजप नेत्या नवनीत राणांचं खळबळजनक विधान

रुग्णाला घेऊन जाणारं अमेरिकन नौदलाचं विमान कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

Supreme Court : पत्नीला खर्चाचा हिशोब ठेवण्यास सांगणे क्रूरता नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

SCROLL FOR NEXT