Ashes 2023  Joe Root Reverse Scoop
Ashes 2023 Joe Root Reverse Scoop  esakal
क्रीडा

Ashes 2023 Joe Root : रूटने वर्ल्ड चॅम्पियन्सची पार लाज काढली; भारताची भंबेरी उडवणारा बोलँडही हतबल

अनिरुद्ध संकपाळ

Ashes 2023 Joe Root Reverse Scoop : अॅशेस 2023 च्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने नुकतेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाची पार लाजच काढली. इंग्लंडनले पहिल्या दिवशी 8 बाद 393 धावांवरच आपला डाव घोषित करत आपल्या गोलंदाजीवर प्रचंड विश्वास दाखवला. इंग्लंडकडून जो रूटने 152 चेंडूत नाबाद 118 धावांची शतकी खेळी केली. त्याने तब्बल सात वर्षांनी अॅशेसमध्ये शतकी खेळी केली. याचबरोबर ब्रेअस्टोने 78 धावा तर सलामीवीर जॅक क्राऊलीने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली.

जो रूटने पहिल्या डावात अँकर इनिंग खेळत नाबाद शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने सामन्याच्या पहिल्यात दिवशी 8 बाद 393 धावा केल्या. विशेष म्हणजे इंग्लंडने आपला पहिला डाव पहिल्याच दिवशी घोषित करण्याची जोखीम उचलली.

बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत होत्या. अखेर जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी सहाव्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचत पहिल्या दिवसाच्या खेळवर आपले नियंत्रण मिळवले. जो रूटने 152 चेंडूत नाबाद 118 धावांची खेळी केली. त्याने संघी मिळताच मोठे फटके मारले.

जो रूटने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर अधिराज्य गाजवले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, त्याने स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर मारलेला अप्रतिम रिव्हर्स स्कूप! बोलँडने रूटला ऑफ स्टम्पच्या बाहेर एक चेंडू टाकला. त्यावर रूटने रिव्हर्स स्कूप फटका मारत चेंडू सीमापार टोलवला.

इंग्लंडचा माजी कर्णधार निसार हुसैन यांनी यंदाच्या अॅशेस ट्रॉफीत जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन हे चांगल्या धावा करतील असे भाकित केले आहे.

हुसैन स्काय स्पोर्ट्शी बोलताना म्हणाले की, 'यंदाच्या मालिकेत जागतिक क्रिकेटमधील तीन दिग्गज फलंदाज खेळत आहे. जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन! बचावात्मक विधान करत आहे त्याबद्दल माफी मागतो. मात्र या मालिकेत तिघेही धावा करतील.

हुसैन पुढे म्हणाले की, या मालिकेत फारसे ड्रॉ सामने होणार नाहीत. ब्रँडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनखाली खेळणाऱ्या इंग्लंडने गेल्या 12 कसोटी सामन्यातील एकही सामना ड्रॉ करण्याच्या उद्येशाने खेळलेला नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT