Asia Cup Hockey India Defeat Indonesia By 16 - 0 Enter Super 4 esakal
क्रीडा

Asia Cup Hockey : भारताचा इंडोनेशियावर 16-0 ने मोठा विजय; पाकचा पत्ता कट

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघांना आशिया कप स्पर्धेत (Asia Cup Hockey) साखळी फेरीत इंडोनेशियाचा 16 - 0 अशा गुणफरकाने पराभव केला. भारताने या विजयाबरोबरच सुपर 4 मध्ये देखील प्रवेश केला आहे. भारताने आजचा सामना जिंकत पाकिस्तानशी बरोबरी केली. भारतासाठी (Team India) गोलमधील फरक देखील पाकिस्तानपेक्षा चांगला असणे गरजेचे होते. त्यामुळे भारताला 16 गोलफरकाने विजयी होणे गरजेचे होते. भारताने जरी इंडोनेशियाचा 16 - ० असा पराभव केला असला तरी भारताचा हा सर्वात मोठा विजय नाही. यापूर्वी 1932 मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेचा 24-1 ने पराभव केला होता.

2023 मध्ये होणाऱ्या हॉकीच्या वर्ल्डकपचे आयोजन भारतात होणार आहे. त्यामुळे भारत वर्ल्डकपसाठी आधीच पात्र झाला होता. मात्र पाकिस्तानला 2023 मधील वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी पार करता आलेली नाही. तर जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया वर्ल्डकपसाठी पात्र झाले आहेत. सुरूवातीच्या सामन्यात भारतीय संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर गेला होता. मात्र पूल ए मधील सामन्यात जपानने पाकिस्तानचा (Pakistan) 3-2 असा पराभव केला आणि भारताला संधी मिळाली. पहिल्या दोन सामन्यात भारताचा लौकिकास साजेसा खेळ झाला नव्हता. सलामीचा भारत - पाकिस्तान सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर भारताला जपानने 5-2 असा पराभव सहन करावा लागला.

पूल ए मध्ये जपान 9 अंकासह नॉक आऊटसाठी पात्र झाला आहे. त्याने आपले तीनही सामने जिंकले. तर पाकिस्तानने तीन सामन्यापैकी एक सामना जिंकला होता. तर एक ड्रॉ आणि एक पराभवामुळे ते 4 गुणांवर होते. भारतही गुणतालिकेत 4 गुण घेऊन पाकिस्तानच्या बरोबर होता. मात्र गोलफरकामुळे भारताने सुपर 4 मध्ये स्थान मिळवले. भारत आशिया कप हॉकी स्पर्धेत विक्रम आठव्यांदा फायनल्समध्ये पोहचला आहे. पाकिस्तानने 6 वेळा फायनल गाठली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT