Sri Lanka sakal
क्रीडा

Australia : आर्थिक संकटातील श्रीलंकन मुलांसाठी टीम ऑस्ट्रेलिया आली धावून

श्रीलंकेबरोबरचेही आमचे संबंध अतिशय चांगले आहेत,

सकाळ वृत्तसेवा

मेलबर्न : केवळ क्रिकेटच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया खेळाडू (Australia Cricket Team) समाजभानही जपत असतात याचे आणखी एक उदाहरण त्यांनी नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौऱ्यातून दिले. या दौऱ्यात मिळवलेली ४५ हजार डॉलरची बक्षीस रक्कम आर्थिक संकटात (Sri Lanka Economical Crisis) सापडलेल्या श्रीलंकेतील मुलांच्या कल्याणासाठी ‘यूनिसेफ’कडे दिली.

२०१६ नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच श्रीलंका दौऱ्यावर गेला. श्रीलंकेत यादवी सुरू असतानाही त्यांनी एकदिवसीय, ट्वेन्टी-२० आणि कसोटी सामन्यांचा दौरा पूर्ण केला. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी कर्णधार असलेला अॅरॉन फिन्च आणि कसोटी कर्णधार पॅट कमिंस यांनी पूर्ण संघाच्या वतीने सामन्यातून मिळालेली बक्षीस रक्कम युनिसेफकडे सुपूर्द केली. ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूंच्या या कार्याचे आम्ही आभारी आहोत, असे युनिसेफ ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉनी स्टुअर्ट यांनी सांगितले.

२०२१ मार्च-एप्रिल महिन्यात भारतात आयपीएल सुरू असताना कोरोनाचा कहर झाला होता. त्या वेळी कोलकाता संघातून खेळणाऱ्या पॅट कमिन्सने सर्वांत प्रथम मोठी रक्कम कोरोना लढ्यासाठी दिली होती, त्यानंतर काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला होता. एकूण ५० हजार डॉलरची ती रक्कमही युनिसेफच्या माध्यमातून देण्यात आली होती. श्रीलंकेबरोबरचेही आमचे संबंध अतिशय चांगले आहेत, असेही टॉनी स्टुअर्ट यांनी पत्रकात म्हटले आहे.

श्रीलंकेत क्रिकेट मालिका खेळत असताना मैदानाबाहेर घडत असलेल्या घटना खेळाडूंना खिन्न करणाऱ्या होत्या. या संकटाचा मुलांना अधिक फटका बसत होता. त्यांना आपण मदतीचा हात पुढे करायला हवा, अशी भूमिका कमिन्सने मांडली आणि तिची अंमलबजावणीही केली.यासाठी निधीचा वापर मदतीची ही रक्कम मुलांना पोषक आहार, आरोग्य सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी, शिक्षण आणि मानसोपचार यासाठी वापरण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ने वडापाव सोडला, तीन महिन्यांची न थकता ट्रेनिंग! ११ किलो वजन कमी करण्यामागचं गुपित अभिषेक नायरने उलगडलं

Crime News : किरकोळ वादातून चाकू हल्ला आणि खून! फरारी आरोपी राजूचा ११ वर्षांपूर्वीचा थरार; संजय पिसेंची यशस्वी उकल

Nashik Crime : ५० लाखांची लाच मागितली! नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला सीबीआय कडून अटक, तात्काळ निलंबित

Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी... प्रियजनांना पाठवा लक्ष्मीपूजनाच्या मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

Video : ''परधर्मातील मुलासोबत पळून जाणाऱ्या मुलींचे हातपाय तोडा'', भाजपच्या माजी खासदाराचं वादग्रस्त विधान!

SCROLL FOR NEXT