CWC 23 Point Table esakal
क्रीडा

CWC 23 Point Table : अफगाणिस्तान कोमात पाकिस्तान जोमात, सेमी फायनलचा खुट्टा होणार बळकट?

CWC 23 Point Table: अफगाणिस्तानच्या पराभवाने पाकिस्तान सेमी फायनलमध्ये जाणार का?

अनिरुद्ध संकपाळ

CWC 23 Point Table : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये आतापर्यंत भारत, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांनी सेमी फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केला. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननं कडवी झुंज दिली होती. मात्र एकटा मॅक्सवेल अफगाणिस्तान अन् विजयामध्ये उभा राहिला त्यामुळे कांगारू सेमी फायनलमध्ये पाऊल ठेऊ शकले.

झुंजार अफगाणिस्तानने पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला दिलेली टक्कर वाखाण्याजोगीच आहे. मात्र फिल्डिंगमधील गंभीर चुकांमुळे त्यांना ऐतिहासिक विजयापासून मुकावे लागले. अफगाणिस्तानच्या पराभवाचा फायदा ऑस्ट्रेलियासोबतच पाकिस्तानला देखील झाला आहे.

पाकिस्तानसाठी यंदाचा वनडे वर्ल्डकप हा एक वाईट स्वप्नासारखा आहे. मात्र नशीबाच्या आधारावर त्यांच्या अजूनही सेमी फायनलच्या आशा जिवंत आहेत. त्यात अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात झालेला पराभव त्यांच्या चांगलाच पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान सध्या 8 सामन्यांपैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांचे आठ गुण झाले असून इतकेच गुण घेणारी न्यूझीलंड सरस नेट रनरटेच्या आधारावर चौथ्या स्थानावर आहे.

सेमी फायनल गाठण्यासाठी कोणाला किती संधी?

सेमी फायनलचा एकच स्लॉट शिल्लक आहे. या स्लॉटसाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान रेसमध्ये आहेत. या सर्व संघांचा शेवटचा सामना शिल्लक आहे. मात्र या तीनही संघांना फक्त विजय नाही तर मोठ्या फरकाचा विजय मिळवणे आवश्यक आहे.

पाकिस्तानला कशी आहे संधी?

पाकिस्तानला इंग्लंडविरूद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. न्यूझीलंड जर श्रीलंकेकडून पराभूत झाली तर पाकिस्तानचा रस्ता मोकळा आहे. अफगाणिस्तान जरी दक्षिण अफ्रिकेविरूद्ध जिंकली तरी त्यांचे नेट रनरेट कमी असल्यामुळे पाकिस्तानला त्याचा फायदा होऊ शकतो.

न्यूझीलंडला कशी आहे संधी?

पाकिस्तानविरूद्ध 401 धावांचा पाऊस पाडल्यानंतही न्यूझीलंडचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचे सेमी फायनलचे तिकीट वेटिंगमध्ये गेले. आता त्यांना श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

जर न्यूजीलंड श्रीलंकेविरूद्ध हरला तर त्यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपापले सामने गमवावेत अशी प्रार्थना करावी लागले. हे तीनही संघ हरले किंवा जिंकले तर +0.398 या चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंडचा फायदा होऊ शकतो.

अफगाणिस्तानला कशी आहे संधी?

अफगाणिस्तानचं सेमी फायनल गाठण्यासाठीचं गणित खूप अवघड आहे. त्यांनी दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना जिंकला तर त्यांचे 10 गुण होतील. ते गुणांच्या बाबतीत पाकिस्तान आणि न्यूझीलंडशी बरोबरी करतील. मात्र त्यांचे नेट रनरेट सर्वात कमी आहे. त्यामुळे ते सेमी फायनल गाठण्याची आशा कमी आहे.

जरी नेट रनरेट कमी असलं तरी अफगाणिस्तानला सेमी फानयल गाठण्याची अजून एक संधी आहे. अफगाणिस्तानला दक्षिण अफ्रिकेवर विजय मिळवावा लागेल. न्यूझीलंड जर श्रीलंकेकडून हरली आन् इंग्लंडने पाकिस्तानला मात दिली तर अफगाणिस्तानचा रस्ता साफ होईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगावकरांचा श्वास कोंडला! महामार्गावर धुळीचे लोट, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांकडे बोट

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Latest Marathi News Live Update : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची बंगळुरूत धडक कारवाई

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

SCROLL FOR NEXT