Australian news anchors sledge Novak Djokovic esakal
क्रीडा

न्यूज अँकरची जोकोविचला 'ऑन कॅमेरा' शिवीगाळ

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया ओपन सुरु होण्यापूर्वीच वादावादीचे जोरदार स्मॅश पहावयास मिळत आहे. प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचे (Novak Djokovic) विजा प्रकरण थंड होते ना होते तोच त्याच्या कोरोना पॉझिटिव्ह असतानाही मुलाखत देण्याचा वाद उफाळून आला होता. आता ऑस्ट्रेलियाच्या रिबेका मॅडरन आणि माईक अ‍ॅमोर या दोन न्यूज अँकरनी (Australian news anchors) ऑन कॅमेरा नोव्हाक जोकोविचला शिवीगाळ केली. (Australian news anchors sledge Novak Djokovic)

७ न्यूज मेलबर्न या वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन अँकर नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) बद्दल कोरोना लसीवरुन निर्माण झालेला वाद यावर चर्चा करत होते. याच दरम्यान, एका अँकरने नोव्हाक जोकोविच हा खोटं बोलत आहे. तो **** आहे असे वक्तव्य केले. त्याला उत्तर देताना दुसरा अँकर 'तो **** नुसती कारणे देत आहे. मात्र ती कारणेच त्याला उघड्यावर पाडत आहे.' असे म्हणाला.

नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियात (Australia) दाखल झाल्यानंतर त्याचा विजा रद्द करण्यात आला होता. त्यावेळी त्याला ऑस्ट्रेलिया सरकारने ताब्यात घेऊन परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र न्यायालयाने नोव्हाक जोकोविचला दिलासा देत ऑस्ट्रेलिया सरकारचा निर्णय रद्द केला होता.

नोव्हाक जोकोविचला डिसेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यापासून सूट देण्यात यावी अशी विनंती त्याने केली होती. त्यात आधारे तो ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. मात्र सरकारने त्याला ताब्यात घेतले होते. जोकोविचला ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये (Australia Open) आपले विक्रमी २१ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल खेळणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT