Axar Patel sakal
क्रीडा

Axar Patel ने धोनीसारखा षटकार मारत जिंकली मालिका; विजयानंतर म्हणाला...

अष्टपैलू अक्षर पटेल भारताच्या विजयाचा हिरो ठरला

Kiran Mahanavar

West Indies Vs India 2nd ODI : पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 2 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग 12वा मालिका विजय आहे. अष्टपैलू अक्षर पटेल भारताच्या विजयाचा हिरो ठरला. अक्षर पटेलने (Axar Patel) झुंजार अर्धशतकी खेळी करत वेस्ट इंडीजने ठेवलेले विजयासाठीचे 312 धावांचे आव्हान 49.4 षटकात पार केले. त्याने षटकार ठोकत भारताचा मालिका विजय साकारला.

अष्टपैलू अक्षर पटेलने कठीण काळात भारतासाठी 64 धावांची नाबाद खेळीत भारताला विजय मिळवून दिला. त्याचे हे वनडेतील पहिले अर्धशतक आहे. याआधी त्याने अप्रतिम गोलंदाजी करत 9 षटकात 40 धावा देत 1 बळी घेतला. अक्षर पटेलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सामन्यानंतर तो म्हणाला, ही खेळी माझ्यासाठी खूप खास आहे, कारण त्यामुळे संघाला मालिका जिंकण्यात मदत झाली. मी जेव्हा फलंदाजीसाठी आलो तेव्हा प्रत्येक षटकात 10-11 धावा करण्याचे लक्ष्य माझ्या मनात होते. माझ्यासाठी हे विशेष होते कारण 2017 नंतरची ही माझी पहिली एकदिवसीय मालिका आहे. माझ्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही केले आणि त्यासोबत मालिका जिंकली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 50 षटकात 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपने कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावा केल्या. निकोलस पूरनने 74 धावांची खेळी खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन बळी घेतले. आवेशचा हा डेब्यू वनडे होता आणि तो चांगलाच महागात पडला. त्याने 6 षटकात 54 धावा दिल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 49.4 षटकांत 8 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर (63), संजू सॅमसन (54) आणि शुभमन गिलने 43 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT