Cheteshwar Pujara Dancing esakal
क्रीडा

Video: चेतेश्वर पुजारा सर्व दडपण विसरुन थिरकला

अनिरुद्ध संकपाळ

सेंच्युरियन : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा (South Africa vs India) पहिला कसोटी सामना जिंकत मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली. सेंच्युरियनवर पहिल्यांदाच भारताने कसोटी विजय साजरा केला. त्यानंतर काही खेळाडूंनी हॉटेल बाहेर या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले. यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि आर. अश्विन (R. Ashwin) आघाडीवर होते. या दोघांनाही यापूर्वी आपण भन्नाट डान्स करताना पाहिले आहे. मात्र सेंच्युरियनवरील विजयानंतर चेतेश्वर पुजाराही थिरकला (Cheteshwar Pujara Dancing) हे विशेष. चेतेश्वर पुजाराचा हॉटेल बाहेर डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टीम इंडियाने सेंच्युरियनवर दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव केला. केएल राहुलच्या (KL Rahul) दमदार शतकाच्या (१२३) जोरावर भारताने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद शामीने भेदक मारा करत द. आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावात गुंडळला. भारताला दुसऱ्या डावात फारशी चांगली फलंदाजी करता आली नाही. भारताचा संपूर्ण संघ १७२ धावात बाद झाला. मात्र भारताने दक्षिण आफ्रिकेला ३०० च्या वरचे टार्गेट दिले. त्यानंतर भारताने आफ्रिकेला दुसऱ्या डावात १९१ धावात रोखत सामना ११३ धावांनी जिंकला. भारताने पहिल्यांदाच सेंच्युरियनवर कसोटी (Centurion Test) विजय साजरा केला.

या विजयानंतर संघाने मोठा जल्लोष केला. मैदानावर मोहम्मद शामी आणि ऋषभ पंतने केक कापला. शामीने आपल्या २०० कसोटी विकेट पूर्ण केल्या होत्या. यानंतर हॉटेलवर पोहचताच भारतीय संघाने पुन्हा जल्लोष केला. यावेळी हॉटेल स्टाफही संघाच्या जल्लोषात सामिल झाला. आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि मोहम्मद सिराज हे यावेळी डान्स करत होते. अश्विनने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT