coronavirus impact ipl uncertainties government council meeting Photo Source insidesport 
क्रीडा

मोठी बातमी : यंदाच्या आयपीएलचं भविष्य टांगणीला; 'या' मुद्द्यांवर पेच कायम 

सकाळ डिजिटल टीम

IPL Coronavirus: भारतातील सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या आयपीएलवर यंदा प्रश्नचिन्ह उभं आहे. कोरोनाच्या व्हायरसचं संपूर्ण जगापुढं संकट उभं राहिलं असताना आता आयपीएल होणार की नाही यावरून उलट- सुलट चर्चा सुरू आहेत. येत्या शनिवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे. त्यात बैठकीत यंदाच्या आयपीएलचं भवितव्य ठरणार आहे.

नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण!
जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया या देशांमध्ये मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे बळी गेले आहेत. भारतातही, कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने स्पर्धा रद्द करणे शक्य नसेल तर, प्रेक्षकांविना सामने आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या दक्षिण अफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि अफ्रिका यांच्यातील धर्मशाळा इथला पहिला सामना आज, रद्द झाला आहे. तर, लखनौ आणि कोलकाता येथील सामने प्रेक्षकांविना खेळवले जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत आता आयपीएलच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळं आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिल कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या भारत सरकारने काही देशांमधील नागरिकांचा व्हिसा रद्दा केलाय. ज्या देशांमधील नागरिकांचा व्हिसा रद्द केलाय. त्या देशांतून खेळाडू आयपीएलसाठी येत नसले तरी, या सगळ्या प्रक्रियेत धोका आहे, असे दिसत आहे.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

आणखी वाचा - दवंडी लावून बीडमध्ये वाटले फुकट चिकन

कर्नाटक सरकारचा आयपीएलला विरोध
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचं संयोजन करू नका, असं आवाहन कर्नाटक राज्य सरकारनं केलंय. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारही आयपीएल आयोजित करण्यात फारसं उत्सुक नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अनेकदा भूमिका स्पष्ट केलीय. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेक्षकांविना आयपीएल खेळवा, असा पर्याय सुचवला आहे. पण, हा पर्याय कितपत शक्य आहे, यावरून शंका उपस्थित केली जात आहे. मैदानावर प्रेक्षक आले नाही तर, प्रत्येक टीमच्या फ्रॅंचायझीला गेट मनीवर पाणी सोडावं लागणार आहे. ही रक्कम साधारण 20 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आता हे नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसीआय कोणतं पाऊल उचलणार, हे पहावं लागणार आहे. आयपीएल पुढं ढकलायचा निर्णय झाला तर, कोरोना व्हायरसचं संकट किती दिवस टिकणार याविषयी कोणीही निश्चित सांगू शकत नाही. त्यातच पुढं 18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात आयसीसीचा टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे. त्यासाठी खेळाडूंना तयारी करावी लागणार आहे. खेळाडू किंवा त्यांचे देश वर्ल्ड कपच्या तोंडावर कोणता धोका घेतली का? याविषयीही शंका आहे. त्यामुळं यंदाच्या आयपीएलचं भवितव्य टांगणीला लागलंय. 

आयपीएलसाठी थोडक्यात महत्त्वाचे

  • एका सामन्याच्या निमित्ताने पाच ते 20 हजार जणांना मिळत रोजगार
  • प्रेक्षकांशिवाय आयपीएल झाल्यास टीम फ्रँचायजीचे सुमारे 20 कोटी रुपयांचे होणार नुकसान 
  • आयपीएल किती दिवस पुढे ढकलायची? गव्हर्निंग कौन्सिलपुढे असणार पेस 
  • आयपीएल होणारच, असे म्हणणारा सौरभ गांगुली आता कोणती भूमिका घेणार?
  • बीसीसीआय कोणताही धोका घेण्यास तयार नाही!

आयपीएलपुढे असलेला हा पेच अभूतपूर्व आहे. यापूर्वी स्थानिक मुद्द्यांवर कधी दुष्काळ, कधी सुरक्षा व्यवस्था यावरून आयपीएलला विरोध झाला आहे. पण, यावेळचं संकट जागतिक आहे. बीसीसीआयच्या दृष्टीने ही सर्वांत सन्मानाची स्पर्धा आहे. आयसीसीनेही त्यासाठी वेगळे दिवस काढून ठेवले आहेत. त्यामुळं यंदा स्पर्धा होणार की नाही, याविषयी आता एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. येत्या शनिवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आहे. त्यातच यावर सगळी चर्चा होईल. 
- अभय आपटे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT